1 November 2024 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

Venus Pipes and Tubes Share Price | नुकत्याच लिस्टेड झालेल्या IPO शेअरने 116 टक्के परतावा दिला, स्टॉक आता खरेदी करणार?

Venus Pipes and Tubes Share Price

Venus Pipes and Tubes Share Price | 2022 हे वर्ष IPO च्या दृष्टीने काही खास गेले नाही. अशा काळातही काही कंपन्यांचे IPO सुपरहिट ठरले. ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स सुपरहिट IPO च्या यादीत सामील आहेत. या कंपनीचे शेअर 24 मे 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग किंमत 335 रुपये होती, जी आता वाढून 720 रुपयांवर पोहोचली आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 730.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Venus Pipes & Tubes Share Price | Venus Pipes & Tubes Stock Price | BSE 543528 | NSE VENUSPIPES)

नुकताच ब्रोकरेज फर्म नुवामा रिसर्चच्या तज्ञांनी व्हीनस पाईप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कोठारी यांच्यासोबत एक चर्चा केली होती. त्यानंतर ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली की, ‘व्हीनस पाईप्स’ कंपनीचे शेअर्स कन्सोलिडेशनच्या मार्गावर आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला प्रचंड भांडवली तूट असूनही कंपनीच्या मजबूत ताळेबंद सकारात्मक आहे. याशिवाय कंपनी थेट विक्रीवर अधिक भर देत आहे. नुवामा रिसर्च फर्मने सांगितले की, कंपनीच्या मार्केट शेअरमध्ये पुढील काळात मजबूत वाढ अपेक्षित आहे.

शेअरची लक्ष किंमत :
ब्रोकरेज फर्मने व्हीनस पाईप्स कंपनीच्या शेअरवर 1024 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. यासोबतच तज्ञांनी स्टॉकवर बाय रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यापासून म्हणजेच मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 116 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
गुजरात स्थित व्हीनस पाईप्स कंपनी भारतात स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन आणि निर्यात करण्याचे काम करते. व्हीनस ब्रँड अंतर्गत कंपनी रासायनिक, अभियांत्रिकी, खते, फार्मास्युटिकल्स, ऊर्जा, अन्न प्रक्रिया, कागद, तेल आणि वायू, यासह विविध क्षेत्रातील अनुप्रयोगांसाठी आपले उत्पादन सप्लाय करण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Venus Pipes & Tubes Share Price 543528 VENUSPIPES stock market live on 03 March 2023.

हॅशटॅग्स

#Venus Pipes and Tubes Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x