1 November 2024 6:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

Olectra Greentech Share Price | भारतातील पहिली हायड्रोजन बस लाँच, कंपनीचा शेअर तेजीत, 3 वर्षांत 1400% परतावा, पैसे लावणार?

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 2.01 टक्के वाढीसह 684.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 11 दिवसांत ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअर्समध्ये 75 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीला इलेक्ट्रिक बसची मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 739.40 रुपये होती.

550 इलेक्ट्रिक बससाठी 1000 कोटींची ऑर्डर :
‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीला तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 550 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही संपूर्ण ऑर्डर 1000 कोटी रुपयांची आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ ही Megha Engineering & Infrastructure Limited म्हणजेच MEIL ची उपकंपनी आहे. या इलेक्ट्रिक बसची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी 16 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनी 50 स्टँडर्ड फ्लोर 12 मीटर लांबीची इंटरसिटी इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करेल. यासोबत कंपनी 12 मीटरच्या 500 इंट्रासिटी इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करेल.

3 वर्षांत 1400 टक्के वाढ :
‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 1486 टक्क्यांनी वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 42.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 2.01 टक्के वाढीसह 684.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 15.86 लाख रुपये झाले असते. इंटरसिटी इलेक्ट्रिक बस एका चार्जवर 325 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालू शकते. त्याच वेळी इंट्रासिटी बस एका चार्जवर 225 किलोमीटरहून अधिक अंतर चालू शकते. इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाईल. आणि या सर्व इलेक्ट्रिक बसेस पूर्णपणे वातानुकूलित असतील.

‘रिलायन्स’ आणि ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने भागीदारीत हायड्रोजन बस लाँच केली होती. ही हायड्रोजन बस ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ सोबत तांत्रिक भागीदारी करून ही बस विकसित केली आहे. बसमध्ये एकदा हायड्रोजन भरल्यानंतर ही बस 400 किलोमीटर अंतर चालू शकते. बसमध्ये हायड्रोजन भरण्यासाठी सुमारे 15 मिनिटे लागतो. या 12 मीटर लो फ्लोअर बसमध्ये सानुकूल आसन क्षमता असेल. बसमध्ये 32-49 प्रवासी बसू शकतात. हायड्रोजन बसच्या वरच्या बाजूला टाइप 4 हायड्रोजन सिलिंडर बसवण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price return on investment check details on 10 March 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x