SBI Home Loan EMI Hike | एसबीआय बँकेच्या गृहकर्जाचा EMI अजून वाढणार, तुम्ही घेतला आहे का होम लोण?
SBI Home Loan EMI Hike | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी ग्राहकांना फटका बसला आहे. एसबीआयने बेस रेट आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (बीपीएलआर) वाढवला आहे. बँकेने बेस रेटमध्ये ०.७० टक्क्यांनी वाढ करून १०.१० टक्के केली आहे. आता बेस रेट 9.40% वरून 10.10% झाला आहे. तर प्राईम लेंडिंग रेट 0.70 टक्क्यांनी वाढून 14.85 टक्के झाला आहे.
एसबीआय एमसीएलआरमध्ये कोणताही बदल नाही
एसबीआयने मार्जिन कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) कोणताही बदल केलेला नाही. रातोरात एमसीएलआर दर 7.90% आहे, तर एक महिन्याच्या कालावधीसाठी तो 8.10% आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर ८.१० टक्के आहे. तसेच 6 महिन्यांचा एमसीएलआर 8.40% आणि एक वर्षाच्या मुदतीवर 8.50% आहे. 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठी एमसीएलआर अनुक्रमे 8.60% आणि 8.70% आहे.
एसबीआय ईबीएलआर/आरएलएलआर
एसबीआयचे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (ईबीएलआर) 9.15% + सीआरपी + बीएसपी आणि आरएलएलआर 8.75% + सीआरपी वर स्थिर आहेत.
ईएमआय वाढणार
बेस रेट आणि बीपीएलआरमधील वाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. हे कर्ज महाग णार आहे. म्हणजे तुमच्या लोनचा ईएमआय वाढेल. अधिक ईएमआय भरावा लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: SBI Home Loan EMI Hike check details on 14 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY
- Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल