6 May 2025 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, स्वस्त झालेला शेअर तेजीत, मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळायला सुरुवात

HFCL Share Price

HFCL Share Price | ‘हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड’ म्हणजेच एचएफसीएल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. स्टॉकमध्ये तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला नुकताच ‘सुरत मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाच्या बांधकामासाठी मेट्रो रेल कॉर्पोरेशन/GMRC कडून 282 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. (Himachal Futuristic Communications Limited)

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स 3.72 टक्के वाढीसह 58.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील बऱ्याच काळापासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव राहिला आहे. मात्र काल हा स्टॉक मजबूत तेजीसह वाढत होता. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5.64 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 8.22 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने लोकांचे 22.49 टक्के नुकसान केले आहे. 2000 साली या कंपनीचे 2035 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत हा स्टॉक 97 टक्के कमजोर झाला आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
GMRC च्या सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज-1 साठी दूरसंचार प्रणालीच्या बांधकामासाठी ‘हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड’ कंपनीला कंत्राट मिळाले आहे. हा प्रकल्प 90 आठवड्यांच्या आत कार्यान्वित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. एचएफसीएल कंपनीने माहिती दिली आहे की, सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज-I साठी कंपनीने डिझाईन, उत्पादन, पुरवठा, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टीम चालू करण्याचा प्रकल्प स्वीकारला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा हिस्सा :
रिपोर्टनुसार, कंपनीच्या क्यूआयपी इश्यूमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 138 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कंपनीतील आपला हिस्सा 5 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स या उपकंपनीच्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीजकडे ३.७६ टक्के हिस्सा होता. आता हा हिस्सा ५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HFCL Share Price on 30 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HFCL Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या