23 May 2024 11:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 24 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell? IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
x

Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरवर टॉप ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, संयमाने हा शेअर आयुष्य बदलू शकतो

Infosys Share Price

Infosys Share Price| ‘इन्फोसिस’ या भारतील दिग्गज आयटी कंपनीच्या समभागामध्ये कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स ‘इन्फोसिस’ 0.084 टक्के घसरणीसह 1,422.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक तेजीत वाढत होता. स्टॉक मध्ये तेजीचा कल कायम आहे, मात्र काही वेळा विक्रीचा दबाव स्टॉक ला खाली घेऊन येतो. तज्ज्ञांच्या मते ‘इन्फोसिस’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1835 रुपयेपर्यंत वाढू शकतात. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1425.85 रुपयांवर क्लोज झाला होता. (Infosys Limited)

शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला
ब्रोकरेज हाऊस एचडीएफसी सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, हा स्टॉक पुढील काळात 1830 रुपये पर्यंत जाऊ शकतो. त्याच वेळी ‘जेएम फायनान्शिअल’ फर्मने ‘इन्फोसिस’ कंपनीच्या शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु ‘जेएम फायनान्शिअल’ फर्मने या स्टॉकसाठी 1,590 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. शेअर बाजारातील एकूण 21 दिग्गज तज्ञांनी ‘इन्फोसिस’ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘इन्फोसिस’ कंपनीच्या शेअरची सरासरी लक्ष्य किंमत 1730.22 रुपये आहे. सध्या जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर तुम्हाला 21 टक्के परतावा मिळू शकतो.

जर तुम्ही ‘इन्फोसिस’ कंपनीचा स्टॉक पुढील एका वर्षासाठी होल्ड करु इच्छित असाल तर, 2383.51 रुपये ही लक्ष किंमत ध्यानात ठेवा. जर शेअर बजार खालच्या दिशेने जाऊ लागला तर हा स्टॉक 1218 रुपये पर्यंत घसरू शकतो. डिसेंबर 2022 तिमाहीच्या आकडेवारीनुसार ‘इन्फोसिस’ कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 15.11 टक्के भाग भांडवल आहेत. कंपनीमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी 36.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहे, जो सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 36.20 टक्के होते. याशिवाय देशांतर्गत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड यानी ‘इन्फोसिस’ कंपनीचे 32.06 टक्के भाग भांडवल धारण केले होते, ते वाढून आता 32.38 टक्के झाले आहे.

‘इन्फोसिस’ शेअर किंमत इतिहास :
इन्फोसिस कंपनीने 1999 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 12202 टक्के परतावा दिला आहे. जानेवारी 1999 रोजी ‘इन्फोसिस’ कंपनीचे शेअर्स प्रति शेअर 11.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1,422.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1889.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1355 रुपये होती. 2023 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक 6.44 टक्के घसरला आहे. पाच दिवसांत ‘इन्फोसिस’ कंपनीचे शेअर्स 3.57 टक्के वाढले आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 142.83 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price on 07 April 2023.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x