कणकवली : शिवसेनेच्या कणकवलीतील सभेला मुंबईवरून भाडोत्री अमराठी माणसे आणल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या संबंधित त्यांनी पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील ट्विटर अकाऊंटवर प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी कणकवलीमध्ये प्रचारसभा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकाच मतदारसंघात दोन सभा घेतल्या. एकाच मतदार संघात पहिली सभा झाल्यानंतर देखील दुसऱ्या सभेला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा मला अभिमान वाटतो, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर नितेश राणे यांनी हा त्यांचा दावा फोल ठरवणारे ट्विट केले आहे. पूर्वी बाळासाहेब असताना ते उभं राहायचे तेथे सभा भरायची हे वास्तव होती. मात्र सध्या चित्र उलटं झालं असून अनेक ठिकाणी सभेला गर्दी दाखवण्यासाठी माणसं पुरवणारी अमराठी लोकं नेमली आहेत जी गाड्या भरून त्यांना सभेच्या ठिकाणी घेऊन येतात, ज्यांचा त्या मतदारसंघाशी आणि तिथल्या भाषेशीसाठी देखील काहीच संबंध नसतो.

याबाबतचा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी शिवसेनेच्या सभेसाठी मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी येथून माणसे गोळा केल्याचा आरोप केला. तसेच या व्हिडिओमध्ये शिवसेनेच्या प्रचारसभेला आलेला अमराठी तरुण मुंबईहून ५० गाड्या घेऊन आल्याचे सांगताना दिसत आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या सर्व सभांची वेळ ही त्याच वेळी असते जेव्हा उद्धव ठाकरेंची एखाद्या ठिकाणी जाहीर सभा असते. मात्र राज ठाकरे मिळत असणाऱ्या हाय टीआरपी’मुळे उद्धव ठाकरे यांची भाषणं हटवली जातात अन्यथा लोकं चॅनेल बदलतात हे टीव्ही वाहिन्यांच्या ध्यानात आल्याने सध्या उद्धव ठाकरेंच्या आणि फडणवीसांच्या सभांना एक कोपरा देण्यात आल्याचे सहज निदर्शनास येते असं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे.

VIDEO: काय आहे तो नेमकं व्हिडिओ?

VIDEO: स्वर्गीय. बाळासाहेबांनंतर शिवसेनेवर सभेसाठी भाडोत्री गर्दी जमविण्याची वेळ