काहीही निष्पन्न होणार नाही? जेपीसी एकूण सदस्य संख्याबळानुसार भाजपचं प्राबल्य असेल, तेच पवारांनी अधीरेखित करून 'योग्य' मुद्दा मांडला

JPC Against Adani Group | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जेपीसीवर आपली भूमिका स्पष्ट केली. जेपीसी म्हणजे काय? ज्वॉइंट पार्लमेंट्री कमिटी. लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह आहेत. या दोन्ही सभागृहातील सदस्यांची ही समिती आहे. या समितीचं फाऊंडेशन कसं होतं. ज्यांची सभासद संख्या अधिक. त्यांना अधिक जागा मिळतात.
त्यांनी उदाहरण देतं सांगितलं
उदा. 21 लोकांची जेपीसी असेल तर 15 लोक सत्ताधारी पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे असतील. तर सहा ते सात लोक विरोधी पक्षाचे असतील. ज्या समितीत विरोधी पक्षाचे नेते इतके कमी आणि सत्ताधारी पक्षाचे लोक अधिक याचा अर्थ ज्याची चौकशी नीट करावी अशी अपेक्षा त्यावर शंका व्यक्त करण्याला वाव आहे, असं शरद पवार म्हणाले.
सरसकट विरोध नाही
त्याऐवजी सुप्रीम कोर्टाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात निवृत्त जज आणि इतर काही लोक आहेत. सुप्रीम कोर्टाने आणखी एक गोष्ट केली. ती म्हणजे, किती दिवसात या समितीने अहवाल सादर करायचा याच्या सूचना केल्या आहेत. म्हणून मी जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाची समिती अधिक योग्य असल्याचं सांगितलं. मी जेपीसीला सरसकट विरोध करत नाही. यापूर्वी जेपीसी होती. काही जेपीसींचा मी सुद्धा चेअरमन होतो. पण जेपीसीत बहुमताच्या संख्येवर पारदर्शक निर्णय होईल याची शाश्वती नाही. जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती अधिक योग्य आहे असं वाटतं, असं पवार म्हणाले.
अजितदादा संपर्काबाहेर? पवारांनी मात्र चर्चा धुडकावून लावल्या
पुणे शहरात शनिवार-रविवारी नियोजित असलेले सर्व कार्यक्रम रद्द करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी रात्री अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा होती. मात्र शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अजितदादांचं पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या शोरुमच्या उद्घाटनाला सपत्नीक दर्शन झालं. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि अजितदादांचे काका शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पत्रकारांनी त्यांना अजितदादा संपर्काबाहेर असल्यावरुन प्रश्न विचारला असता शरद पवारांनी मात्र चर्चा धुडकावून लावल्या.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: NCP President Sharad Pawar on congress JPC demand says supreme court committee is enough check details on 08 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER