15 December 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

Update Aadhaar Card Birth Date online | तुमच्या आधारकार्डवरील चुकीची जन्मतारीख बदलणे झाले सोपे, जाणून घ्या सोप्या स्टेप्स

How to update Aadhar card birth date online

Update Aadhaar Card Birth Date online | सध्याच्या काळात भारतामध्ये आधारकार्ड हे अत्यंत महत्वाचे कार्ड मानले जाते. आधारकार्ड हे भारतातील प्रत्येक रहिवाशांसाठी अनिवार्य आहे. नवजात शिशुपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण आधार नोंदणी करू शकतो. आधारकार्ड हे एका व्यक्तीची ओळख दर्शवत असते. बँकमध्ये स्वतःचं खात उघडण्यापासून ते प्रॉपर्टी विकत घेणे, ड्रायव्हिंग लायसन्स, शाळा आणि कॉलेजमधील ऍडमिशन या सगळ्या गोष्टींसाठी आधारकार्ड असणे अनिवार्य केले गेले आहे. (Can I update my date of birth in Aadhar card online?)

एवढं सगळं असताना आधारकार्ड बनवण्याच्या वेळी अनेकांच्या माहितीमध्ये थोडाफार प्रमाणात चुका झालेल्या असतात. अशातच तुमच्या आधारकार्डवरची जन्मतारीख चुकलेली असेल तर लवकरात लवकर ती दुरुस्त करून घ्या. आजच्या बातमीपत्रामधून आधारकार्डवरची जन्मतारीख कशा पद्धतीने दुरुस्त करायची याची पूर्णपणे माहिती सांगणार आहोत. (How to update address and date of birth in Aadhar card online?)

फक्त या डॉक्युमेंट्सने होईल काम – (Can we update DoB in Aadhar online without proof?)
आधारकार्डवरील जन्मतारखेमध्ये झालेली उलथापालथ बदलण्यासाठी टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. जन्मतारीख बदलण्यासाठी तुमच्याजवळ पॅन कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, राशन कार्ड, पीएसयुकडून कार्यरत असणारे सर्विस फोटो ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारतर्फे असणारे ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड, शिक्षणातील एखाद्या संस्थेकडून मान्यताप्राप्त असलेले फोटो ओळखपत्र, फोटो क्रेडिट कार्ड, शस्त्र लायसन्स आणि बँक एटीएम कार्ड या सगळ्या ओळखपत्रांची गरज असते. याशिवाय तुम्ही पेन्शन फोटो कार्ड, सेनानी फोटो कार्ड, शेतकरी फोटो पासबुक, पोस्ट विभागाकडून कार्यरत असलेले नाव आणि फोटोचे ऍड्रेसकार्ड, ईसीएचएस/ सीजीएचएस फोटोकार्ड ही सगळी ओळखपत्रे तुमची मदत करू शकतात. (What documents are required to change date of birth in Aadhar card?)

जाणून घ्या प्रोसेस – (Can I update my date of birth through Update Aadhaar online Service?)
सर्वातआधी तुम्हाला तुमच्या शहरातील जवळ असणाऱ्या आधार नावनोंदणी केंद्रावर जावे लागेल. त्यानंतर तिकडे जाऊन तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील जन्मतारीख बदलायची आहे असे सांगून आधार अपडेट नावाचा फॉर्म भरून द्यावा लागेल. फॉर्म आणि तुमची जन्मतारीख केंद्रामध्ये जमा करा. तुमची ओळख सादर करण्यासाठी तुम्हाला स्वतःची बायोमेट्रिक्स द्यावी लागेल. आता तुम्हाला यीआरएन वाली एक पावती दिली जाईल. जिच्या मदतीने तुम्ही तुमचे ऑनलाइन अपडेट आधार स्टेटस चेक करू शकाल. त्यानंतर तुम्हाला पन्नास भरावे लागतील. त्यानंतर 90 दिवसांमध्ये तुमची आधार कार्ड वरील जन्मतारीख दुरुस्त होईल.

येथे संपर्क साधा 
तुम्ही myAadhaarportal आणि mAadhaar app वरून सुद्धा आधारकार्डमध्ये माहिती अपडेट करू शकता. आधारकार्डमध्ये कोणतीही डिटेल्स अपडेट करताना येणाऱ्या अडचणीसाठी तुम्ही 1947 या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही [email protected] या मेल आयडीवर मेल करून तुमच्या समस्येवर समाधान मिळवू शकता. Uidai ने आपला हेल्पलाइन नंबर सर्वांच्या लक्षात राहावा म्हणून 1947 असा ठेवला आहे. हा नंबर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचे वर्ष. हा नंबर ठेवण्यामागचं कारण म्हणजे कोणताही व्यक्ती हा नंबर विसरू शकत नाही. हा हेल्पलाइन नंबर 24*7 IVRS मोडमध्ये उपलब्ध असतो.

आधार कार्डवरील जन्मतारखेत असा करू शकता बदल (How to Update Aadhar Card Online?)
१. यासाठी सर्वात प्रथम UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही थेट ssup.uidai.gov.in वर देखील क्लिक करू शकता.
२. वेबसाइटवरील Update Aadhaar सेक्शनमध्ये जाऊन Update Demographics Data & Check Status पर्यायावर क्लिक करा.
३. आता तुम्हाला १२ आकडी आधार नंबर टाका. कॅप्चा व्हेरिफिकेशन पूर्ण केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
४. ओटीपी टाकून व्हेरिफाय करा.
५. आता आधार कार्डवरील जन्मतारीख अपडेट करण्यासाठी ‘Update Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा.
६. येथे तुम्हाला जन्मताराखी अपडेट करण्याचा पर्याय दिसेल. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रं देखील अपलोड करावी लागतील. या सर्व प्रोसेसनंतर तुमच्या आधारवरील जन्मतारखेत बदल होईल.
७. मात्र, लक्षात ठेवा की आधारवरील जन्मतीरख बदलण्यासाठी अथवा अपडेट करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: How to update Aadhar card birth date online process 08 April 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x