4 May 2025 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

VIDEO | पुलवामा हल्ला आणि लोकसभा निवडणूक, यासाठीच मोदींनी मला शांत राहण्यास सांगितलेलं, सत्यपाल मलिक यांनी 'तो' व्हिडिओ ट्विट केला

Video Tweet by Satyapal Malik on Pulwama Attack before Loksabha Election check details on 18 April 2023

VIDEO | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या भूमिकेबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, “मी खात्रीने सांगू शकतो की पंतप्रधानांसाठी भ्रष्टाचार मोठी समस्या नाही”. या वक्तव्यामुळे मोदी सरकार, भारतीय जनता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये स्मशान शांतता पसरली आहे.

जवानांची मागणी फेटाळली होती
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आले तेव्हा मलिक राज्यपाल होते. पुलवामा हल्ला हाताळण्यात भारतीय यंत्रणा, विशेषत: सीआरपीएफ आणि गृह मंत्रालय अकार्यक्षम आणि हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सीआरपीएफने आपल्या जवानांची ने-आण करण्यासाठी विमानांची मागणी केली होती, पण केंद्रीय गृहमंत्रालयाने ती नाकारली होती. तसेच या मार्गाचे प्रभावीपणे सॅनिटायझेशन करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्याचा हेतू होता
या मुलाखतीत मलिक यांनी पंतप्रधानांवर काश्मीरबाबत चुकीची माहिती असल्याचा आणि अज्ञानी असल्याचा आरोप केला. पुलवामा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या त्रुटींबद्दल न बोलण्याच्या सूचना मोदींनी दिल्या होत्या, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. हल्ल्यानंतर काही वेळातच एका फोन कॉलमध्ये मलिक यांनी मोदींसमोर या त्रुटी मांडल्या, पण मोदींनी त्यांना याबाबत गप्प राहण्यास सांगितले. विशेष म्हणजे एनएसए अजित डोभाल यांनी या प्रकरणी मौन बाळगण्याचे निर्देश दिल्याचा दावाही मलिक यांनी केला. मलिक यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानवर दोषारोपण करून भाजप आणि सरकारला निवडणुकीचा फायदा मिळवून देण्याचा त्यावेळी हेतू होता अशी धक्कादायक माहिती मलिक यांनी या मुलाखतीत दिल्याने खळबळ माजली आहे.

आता मोदींचा निवडणुकीतील एक व्हिडिओ ट्वीट केला
आता सत्यपाल मलिक यांनी अजून एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी नरेंद्र मोदी यांचा निवडणुकी काळातील काश्मीरमधील सभेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ”शायद मुझे इसलिए चुप रखा गया था!” ”कदाचित यासाठी मला शांत राहायला सांगितलं होतं वाटतं’

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Tweet by Satyapal Malik on Pulwama Attack before Loksabha Election check details on 18 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या