15 June 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार धडाम, पटापट तुमच्या शहरातील आजचे कोसळलेले नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | 22 एप्रिलला अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी लोकं भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि दान धर्म देखील करतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोक सोन्या-चांदीसारखे दागिने खरेदी करतात. अक्षय्य तृतीयेपूर्वी सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.

सोन्याचा भाव घसरला
सोन्याचा भाव 59,940 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 74 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 510 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 59,940 रुपयांवर पोहोचला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 60,450 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाला होता.

आज सोनं-चांदीचा दर किती झाला?
तर चांदीचा भावही 920 रुपयांनी घसरून 74,680 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले की, प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा स्पॉट भाव 510 रुपयांनी घसरून 59,940 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा किती खाली आहे सोन्याचे दर?
सोनं आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 959 रुपयांनी स्वस्त आहे. याआधी 13 एप्रिल 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोनं 60880 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचलं होतं. तर चांदीही 2094 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. १३ एप्रिल रोजी चांदीने ७५८६९ रुपयांचा उच्चांक गाठला होता.

परदेशी बाजारात सोन्याच्या दरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी चे दर अनुक्रमे 1,986 डॉलर प्रति औंस आणि 24.79 डॉलर प्रति औंस होते.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याचा दर जाणून घेणे खूप सोपे आहे
विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त या 8955664433 मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही लेटेस्ट रेट चेक करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 19 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x