3 May 2025 8:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

No Cost EMI | नो कॉस्ट EMI मुळे अधिक पैसा जातोय? छुप्या चार्जेसमुळे तुमचं मोठं नुकसान होतंय, अधिक जाणून घ्या

No Cost EMI

No Cost EMI | नो कॉस्ट ईएमआय किंवा झिरो कॉस्ट ईएमआय ही आजच्या काळातील लोकप्रिय योजना आहे. केवळ ई-कॉमर्स कंपन्याच नाही तर रिटेल स्टोअर्सदेखील लोकांना नो कॉस्ट ईएमआय पर्यायावर खरेदी करण्याची परवानगी देत आहेत. याच्या मदतीने रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉशिंग मशीन, मोबाइल फोन आणि इतर अनेक वस्तू कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय खरेदी करता येतील. म्हणजेच वस्तू खरेदी वर तुम्हाला कोणतेही व्याज किंवा प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही.

किमतीव्यतिरिक्त इतर कोणते चार्जेस? खात्री करा
नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय निवडून खरेदी करताना तुम्हाला वस्तूंच्या किमतीव्यतिरिक्त इतर कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. नो-कॉस्ट ईएमआय पर्यायात काही छुपे शुल्क देखील असू शकतात.

बहुतांश ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देतात. नो-कॉस्ट ईएमआय ऑफर पाहून अनेक ग्राहक वस्तू खरेदीसाठी आतुर होतात. खरेदीसाठी ही चांगली संधी आहे, असे त्यांना वाटते. त्यांना लागणाऱ्या वस्तू व्याजाशिवाय किंवा अतिरिक्त पैशाशिवाय खरेदी करतील. त्याची किंमत काही महिन्यांत आरामात मोजली जाईल. त्यांची विचारसरणी त्यांच्या खिशावर भारी पडते. विशेषत: ते ग्राहक जे पूर्ण तपासणी न करता ही ऑफर स्वीकारतात. विचार न करता नो कॉस्ट ईएमआयने खरेदी केल्यास तुम्हाला वस्तूंच्या किमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

अधिक चार्जेस लागतील
सणासुदीच्या काळात नो कॉस्ट ईएमआय ऑफर जास्त येतात. आता तुम्हीही या अक्षय्य तृतीयेला खरेदीसाठी या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. तज्ज्ञांच्या मते, ज्या वस्तूंवर ही सुविधा दिली जाते, त्यांची किंमत जास्त असू शकते. काही कंपन्या नो कॉस्ट ईएमआयवर प्रोसेसिंग फीही आकारतात. याशिवाय या पर्यायातून खरेदी केलेल्या वस्तूंचा डिलिव्हरी चार्जही भरावा लागू शकतो, तर नॉर्मल खरेदी केल्यास तुम्हाला हा चार्ज द्यावा लागू शकत नाही.

शॉपिंगपूर्वी हे अवश्य करा
जर तुम्ही या योजनेवर कोणतीही वस्तू खरेदी करणार असाल तर आधी तुम्ही चांगली तपासणी केली पाहिजे. नो-कॉस्ट ईएमआयवर कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी इतर ई-कॉमर्स साइट्स वर किंवा ऑफलाइन वर त्या वस्तूची किंमत नीट जाणून घ्या.

ई-कॉमर्स कंपनी किंवा स्टोअरच्या अटी आणि शर्ती, मुदत, प्रक्रिया शुल्क, प्री-क्लोजर फी, प्रीपेमेंट पेनल्टी आणि लेट पेमेंट चार्जेस बद्दल नक्की जाणून घ्या. हे सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच या योजनेतून तुमचे पैसे वाचवत आहात किंवा कंपनी तुम्हाला वस्तू विकण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयच्या नावाखाली मूर्ख बनवत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: No Cost EMI hidden charges check details on 21 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#No Cost EMI(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या