1 May 2025 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

Varun Beverages Share Price | या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स वाटप करून श्रीमंत केले, लोकांचे पैसे अनेक पट वाढले

Varun Beverages Share Price

Varun Beverages Share Price | शेअर बाजारातील मोठे गुंतवणुकदार आणि तज्ञ नेहमी दीर्घ कालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. कारण त्यात गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट असे विविध प्रकारचे फायदे मिळत असतात. असाच एक स्टॉक आहे, ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचा.

मागील काही वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 1,457.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

वरुण बेव्हरेजेस कंपनीचा IPO 2016 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO स्टॉकसाठी 440 रुपये ते 445 रुपये प्रति शेअर ही किंमत बँड ठरवली होती. या कंपनीच्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 33 शेअर्स जारी करण्यात आले होते. गुंतवणूकदाराना या IPO स्टॉकसाठी 14685 रुपये गुंतवणूक करावी लागली होती.

कंपनीचा बोनस शेअर इतिहास :
वरुण बेव्हरेजेस कंपनीने शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून तीन वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. प्रत्येक वेळी या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना बोनस म्हणून 2 शेअर्सवर 1 मोफत बोनस शेअर वितरित केला होता. नोव्हेंबर 2016 मध्ये सूचीबद्ध झाल्यानंतर वरूण बेव्हरेजेस कंपनीने 25 जुलै 2019, 10 जून 2021, 6 जून 2022 रोजी कंपनीचे शेअर्स एक्स बोनस डेटवर ट्रेड करत होते.

ज्या गुंतवणूकदारानी वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, ते लोक आता श्रीमंत झाले आहेत. जर तुम्ही वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करून स्टॉक होल्ड केला असता तर सर्व बोनस शेअर्स जोडून तुमच्या शेअरची संख्या 92 वर पोहोचली असती. म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अवघ्या 14 हजार रुपये गुंतवणूकीवर 134000 रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Varun Beverages Share Price today on 08 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Varun Beverages Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या