नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आज ७ राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही ६वी फेरी असून बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, युपी, पश्चिम बंगाल अशा एकूण ७ राज्यांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये ९७९ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
या टप्प्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी, राधा मोहन सिंह, हर्षवर्धन, कृष्णपाल गुर्जर, राव इंदरजित सिंह, नरेंद्र सिंह तोमर, तसेच गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, निरहुआ, मनोज तिवारी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, विजेंदर सिंह, भूपिंदरसिंह हुडा व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे.
