24 June 2019 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या? तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप ५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
x

सरकारचं पाऊल डगमगल्यास संघ देणार सकारात्मक सल्ला: सरसंघचालक

सरकारचं पाऊल डगमगल्यास संघ देणार सकारात्मक सल्ला: सरसंघचालक

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देदीप्यमान यश मिळवलं. दरम्यान, या यशाचं श्रेय कुठे तरी संघाला देखील दिलं जातंय. आता मोहन भागवत म्हणाले की, जर मोदी सरकारचं एखाद्या विषयावर पाऊल डगमगत असल्याचं दिसल्यास संघाकडून त्यांना सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य सल्ला देण्यात येईल. कानपूरच्या पं. दीनदयाल उपाध्याय सनातन धर्म विद्यालयाच्या संघ शिक्षावर्गाला संबोधित करताना ते बोलत होते.

देशात जे लोकशाही व्यवस्थेतून निवडून येतात, त्यांच्याकडे सार्वधिक अधिकार असतात. त्याचा अर्थ असा नाही की, त्या अधिकारांचा गैरवापर केला जावा. जर कोणत्याही कारणास्तव सरकारचं पाऊल डगमगलं तर संघ त्यांना सकारात्मक सल्ला देईल. आपल्या माणसांबरोबर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. जर कोणत्याही कारणास्तव निराशा असल्यास तसं मोदी सरकारनं आम्हाला सांगावं, असं देखील मोहन भागवत म्हणाले आहेत.

आम्ही संघाचं केंद्र नागपूरहून हलवून दिल्ली करू शकतो. परंतु असं न करणं कधीही चांगलंच राहील. स्वयंसेवकांना उद्देशून मोहन भागवत म्हणाले, कितीही चांगलं काम केलं असलं किंवा इतरांची मदत केली असली तरी कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकाराला बाळगू नका. इतरांना उपकाराच्या भावनेनं मदत करण्याची प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असली पाहिजे. संघाच्या कार्यांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला असून, स्वयंसेवकांचा मान देखील आता वाढला आहे, हे ऐकून प्रचंड आनंद झाला. संघप्रमुख मोहन भागवत शनिवारीच कानपूरला आले आहेत. ते संघाकडून २४ मे ते १३ जूनपर्यंत चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थिती दर्शवण्यासाठी पोहोचले होते.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Narendra Modi(860)#RSS(25)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या