4 May 2024 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

Monsoon Update | महाराष्ट्रसह आठ राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळाचा अलर्ट जारी, केरळमध्ये मान्सून दाखल होतोय

Highlights:

  • Monsoon Update
  • येत्या 2 दिवसात केरळमध्ये मान्सून दाखवल होईल
  • आठ राज्यात अलर्ट जारी
  • नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस
  • महाराष्ट्रात कधी येणार पाऊस
Monsoon Update

Monsoon Update | अरबी समुद्रात निर्माण झालेले या वर्षातील पहिले चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ची तीव्रता वेगाने वाढली आहे. यामुळे केरळमध्ये मान्सूनचा प्रभाव धीमा झाला आहे. तसेच, दक्षिण द्वीपकल्पाच्या पुढेही त्याची प्रगती कमजोर झाली आहे. तरीही केरळमध्ये दोन दिवसांत मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

येत्या 2 दिवसात केरळमध्ये मान्सून दाखवल होईल

येत्या 2 दिवसात केरळमध्ये मान्सून दाखवल होईल असं हवामान विभागाने म्हटलंय. तर हवामान तज्ज्ञांनी मान्सून वेळेत आला तरी पहिल्या आठवड्यात त्याचे प्रमाण कमी असेल असं म्हटलं आहे. मान्सूनची हलकी सुरुवात होण्यामागे बिपरजॉय चक्रीवादळ असल्याचं सांगण्यात येत आहे. चक्रीवादळामुळे केरळमध्ये सुरुवातीच्या आठवड्यात मान्सून धीमा राहील.

आठ राज्यात अलर्ट जारी

चक्रीवादळामुळे हवामान विभागाने आठ राज्यात मुसळधार पाऊस आणि वादळाचा अलर्ट जारी केला आहे. बुधवारी सकाळपर्यंत वादळ गोवा किनारपट्टीपासून 900 किमी दूर होतं. हवामान विभागाने सांगितलं की, चक्रीवादळामुळे गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडु, गुजरात, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात 8 जून रोजी हवेचा वेग 125 किमी प्रतितास इतका असू शकतो.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून मान्सून पूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात 12 जूनपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे गर्मीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात कधी येणार पाऊस

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे होता. यामुळे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला तर राज्यात सुमारे 15 जूनच्या आसपास पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत. पण, त्याबाबत हवामानशास्त्र विभागाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Latest Marathi News : Monsoon Update Biporjoy cyclone effect check details on 08 June 2023.

हॅशटॅग्स

#Monsoon Update(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x