30 April 2025 10:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

भूकंप होणार! राज्यातील भाजप ओबीसी आणि मराठा नैतृत्वाला संपवणाऱ्या ब्राह्मण नेत्याला रिक्षावाला-चहावाला मिळून 2024 मध्ये बाजूला करणार?

Highlights:

  • Amit Shah Vs Devendra Fadnavis
  • अमित शहांच्या रडारवर फडणवीस
  • फडणवीसांचा चुकीचा सल्ला आणि दिल्लीत चर्चा
  • ओबीसी आणि मराठा नेत्यांचा जुना राग
  • आता त्या नेत्यांवर वॉच
  • मोदी पक्षातील ब्राह्मण नेत्यांना कसे बाजूला करतात – जय नारायण व्यास
Maharashtra Politics Crisis

Amit Shah Vs Devendra Fadnavis | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात जाहिरबाजी सुरु आहे. या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात लोकप्रियता जास्त असल्याचे सांगण्यात आले होते. या जाहिरातीवरून भाजपच्या इतर नेत्यांनी आक्षेप घेतला होता. तर देवेंद्र फडणवीसांनी अनेक दिवसांपासून मौन बाळगले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंवर नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. पण आता दिल्लीच्या सूत्रांकडून महत्वाची माहिती येतं असून त्याने फडणवीसांची चिंता वाढू शकते.

अमित शहांच्या रडारवर फडणवीस

राज्यात शिंदे गट फुटल्यानंतर महाविकास सरकार कोसळलं होतं. मात्र महाराष्ट्रात पत्रकार परिषदेत घेऊन घोषणा करण्यापूर्वी शिंदे मुख्यमंत्री होणार हे शिंदेंना माहिती होतं अशी माहिती दिल्लीतील भाजपच्या सूत्रांनी सांगितलं. पण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार हे फडणवीसांना भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं नव्हतं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे जाहीर केल्यानंतर फडणवीस घरी पोहोचण्यापूर्वी भाजपने दिल्लीतून अधिकृत ट्विट करून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार आहेत असं जाहीर करून एकप्रकारे फडणवीसांशी चर्चा न करताच आदेश दिले होते. त्या राजकीय गेम मागे सुद्धा अमित शहा होते अशी माहिती पुन्हा समोर आली आहे.

विशेष म्हणजे आपला गेम कोणी केला हे फडणवीसांना देखील माहिती होतं. त्यामुळे या घटनेनंतर राज्य भाजपमध्ये पडसाद उमटून अमित शहा यांच्या विरोधात बॅनरबाजी झाली होती. तेच वृत्त पसरलं आणि तेव्हापासून ब्राह्मण नेते असलेले देवेंद्र फडणवीस गुजरात लॉबीच्या रडारवर होते.

फडणवीसांचा चुकीचा सल्ला आणि दिल्लीत चर्चा

दिल्लीला शिवसेना फोडण्याचा सल्ला देणारे सुद्धा देवेंद्र फडणवीस होते. स्वतः त्यांनी देखील हे मुलाखतीत मान्य केलं आहे. पण, ठाकरेंना बाजूला केल्याने आता महाराष्ट्र हातून जाणार असल्याने फडणवीसांचा सल्ला अत्यंत चुकीचा होता हे दिल्लीला पटल्याने फडणवीसांचं दिल्लीत वजन घटलं आहे. आता दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना अमित शहा यांच्या मार्फत थेट उपलब्ध असतात. येथे फडणवीसांचा मध्यस्त अमित शहांनी काढून टाकल्याची माहिती आहे. राज्यातील बिल्डर लॉबी आणि राजकीय अर्थकारण हाताळण्यात एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत उजवे असल्याचं देखील दिल्लीच्या निदर्शनास आल्याने फडणवीस गुजरात लॉबीसाठी साईडलाईन झाल्याची बातमी आहे. केवळ २०२४ लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना सांभाळलं जाईल आणि त्यानंतर राज्यात त्यांचा कार्यक्रम होईल असं एका भाजपच्या सूत्राने म्हटले आहे.

ओबीसी आणि मराठा नेत्यांचा जुना राग

राज्यात अनेक ओबीसी आणि मराठा भाजप नेत्यांना बाजूला करणारे देवेंद्र फडणवीस होते हे आज लपून राहिलेले नाही. तसेच पक्षात असलेल्या ओबीसी आणि मराठा नेत्यांवर, ब्राम्हण नेते देवेंद्र फडणवीस हेच ओबीसी-मराठा नेत्यांचे सर्वेसेवा आहेत अशी बोलण्याची वेळ आणि परिस्थिती देखील निर्माण केली याची देखील दिल्लीने दखल घेतली आहे. भाजपचा मूळ मतदार ओबीसी आहे आणि महाराष्ट्रातील राजकारण हे मराठा नेत्यांभोवती असताना फडणवीसांनी जाणीवपूर्वक भाजपमधील ओबीसी आणि मराठा नेत्यांविरुद्ध राजकीय कुरघोड्या केल्याची माहिती दिल्लीला पोहिचली आहे. त्यामुळे अमित शहांनी शिंदे आणि युतीच्या आडून फडणवीसांना शह देण्याची योजना आखल्याची माहिती दिल्लीच्या गोटातून पुढे आली आहे. दिल्लीच्या आशीर्वादानेच २ दिवसांपूर्वीची जाहिरात झळकली होती अशी देखील माहिती समोर आली आहे. त्यात थेट देशात मोदी आणि राज्यात शिंदे हा शीर्षक दिल्लीच्या आशीर्वादानेच देण्यात आल्याची माहिती दिल्लीच्या सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना पुढे करून तो फडणवीसांना थेट इशाराच देण्यात आल्याची माहिती आहे.

आता त्या नेत्यांवर वॉच

यापुढे राज्यातून कोण कोण देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलतोय त्या नेत्यांवर दिल्ली नजर ठेवणार आहे. तसेच ती माहिती दिल्लीत पोहोचवली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. राज्य भाजपातील अनेक ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये फडणवीसांविरोधात जुना सुप्त राग आहे. त्याला देखील दिल्ली वाट करून देऊ शकते असं म्हटलं जातंय.

मोदी पक्षातील ब्राह्मण नेत्यांना कसे बाजूला करतात – जय नारायण व्यास

नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीपर्यंत 32 वर्षे भाजप पक्षासोबत असलेले ज्येष्ठ नेते जय नारायण व्यास यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. गुजरातमध्ये ते वर्षानुवर्षे भाजप आणि मोदींचे संकटमोचक म्हणून सर्वांना परिचित होते. ब्राम्हण असलेले व्यास यांनी मोदींच्या पंतप्रधान पदापर्यंतच्या प्रवासात मोठी भूमिका बजावली होती. त्या प्रवासातील अनेक गुपित आणि मोदींचे सिक्रेट ‘5M’ त्यांना ठाऊक होते.

पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर त्यांनी आधीच सिक्रेट ‘5M’ वर काम करण्याची योजना आखली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकार दीपक शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. ते सिक्रेट ‘5M’ अत्यंत धक्कादायक असून त्यातील ‘पाचवा M’ तर विरोधकांसाठी किती धोकादायक आहे याचा अंदाज ती मुलाखत पाहिल्यावर येऊ शकतो. तसेच नरेंद्र मोदी भाजपमधील ब्राह्मण नेत्यांना का आणि कसं राजकीय दृष्ट्या संपवतात याची देखील माहिती दिली होती. त्यामुळे पुढे महाराष्ट्रात नितीन गडकरी आणि तर उपमुख्यमंत्री झालेले फडणवीस यांचा सुद्धा भविष्यात राजकीय खेला होणार नाही ना अशी शक्यता देखील बळावली आहे.

News Title : Maharashtra Politics crisis in Shivsena BJP alliance check details on 15 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra Politics Crisis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या