4 May 2025 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Lok Sabha Election 2024 | 2024 मध्ये जनतेला नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल - अमित शहा

Lok Sabha Election 2024

Amit Shah | 2024 मध्ये काँग्रेस राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न करत असून जनतेला नरेंद्र मोदी आणि राहुल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सभेत बोलताना अमित शहा यांनी विचारले की, 2024 मध्ये पंतप्रधान कोण होणार, राहुल बाबा की नरेंद्र मोदी? असा प्रश्न केला. छत्तीसगडमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने अमित शहांचे राज्यात दौरे सुरु झाले आहेत.

उद्या पाटण्यात होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वी शहा अमित यांनी २०२४ मध्ये पंतप्रधानपदासाठी मोदी आणि राहुल यांच्यात स्पर्धा निर्माण करून विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याच्या अमित शहा यांच्या दाव्यामागे मोठा राजकीय हेतू असल्याचे राजकीय विश्लेषकांना दिसत आहे. विरोधी पक्ष एकाच व्यासपीठावर जमले तरी चेहऱ्याच्या नावात फूट पडू शकते, असे जाणकारांचे मत आहे. विरोधी गटातील अनेक नेत्यांना पंतप्रधानपदावर दावा करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच शहा यांनी राहुल यांचे नाव घेतल्याचे समजते.

मोदी सरकारची कामगिरी
अमित शहा म्हणाले की, 9 वर्षात मोदींनी जगात देशाची मान उंचावला आणि देशाची अर्थव्यवस्था जगातील 11 व्या स्थानावरून पाचवी अर्थव्यवस्था बनवली. नऊ वर्षांत मोदी सरकारने बरेच बदल केले, तर १० वर्षे सत्तेत असलेल्या मनमोहन सिंग सरकारने घोटाळे आणि प्रचंड भ्रष्टाचार केला, तर नऊ वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही.

अमित शहा म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत देशात दहशतवादी घटना घडत असत, आपल्या जवानांचे शिरच्छेद केले जायचे. काश्मीरमधील पुलवामा आणि उरी येथील हल्ल्याची पाकिस्तानला सवय झाली होती, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. शहा म्हणाले की, त्यांच्या सरकारने काश्मीरमधून कलम 370 हटवले, जे काँग्रेस सरकार 70 वर्षे हटवू शकले नाही.

फक्त जिथे काँग्रेस सत्तेत तिथे बेरोजगारीचा मुद्दा?
विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडमध्ये दाखल झालेले शहा म्हणाले की, येथील बघेल सरकार घोटाळ्यांवर घोटाळे करत आहे. हे आश्वासन मोडणारे सरकार आहे. दारूबंदीचे आश्वासन पूर्ण केले नाही, उलट घरपोच डिलिव्हरी सुरू केली. १० लाख नोकऱ्यांचे आश्वासन पूर्ण झालेले नाही. वयोवृद्ध मातांना वृद्धापकाळ पेन्शन मिळत नाही, तसेच राज्यावर दीड लाख कोटींचे कर्ज आहे. राज्यात बघेल सरकारच्या कार्यकाळात एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या छोट्या राज्यात पाच हजार बलात्काराच्या घटना घडल्या.

मोदी सरकारने राज्याला नऊ वर्षांत तीन लाख कोटी रुपये दिले, तर दहा वर्षांच्या मनमोहन सिंग सरकारच्या काळात केवळ ७४ हजार कोटी रुपये मिळाले. मोदी सरकारने दिलेली ही रक्कम भ्रष्टाचाराला बळी पडली आहे. ते म्हणाले की, छत्तीसगडची जनता या सरकारला कंटाळली आहे आणि ते निवडणुकीची वाट पाहत आहेत. निवडणुकीत या सरकारची खुर्ची बदलणार आहे.

News Title : Lok Sabha Election 2024 check details on 22 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election 2024(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या