4 May 2025 10:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीची विक्री वाढली, शेअरला मजबूत फायदा होणार? स्टॉक खरेदी वाढली

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | मागील काही महिन्यांपासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमधे सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. आता टाटा मोटर्स कंपनीच्या देशांतर्गत वार्षिक विक्रीमध्ये एक टक्क्याची वाढ झाली असून, कंपनीची वार्षिक विक्री 80,383 युनिट्सवर पोहोचली आहे. टाटा मोटर्स कंपनीने जून 2022 मध्ये एकूण 79,606 वाहनांची विक्री केली होती.

टाटा मोटर्स कंपनीने माहिती दिली की, देशांतर्गत प्रवासी वाहनांची आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांची एकूण विक्री जून 2022 मधील 45,197 युनिट्सच्या तुलनेत जून 2023 मध्ये 47,235 युनिट्स नोंदवली गेली आहे. म्हणजेच त्यात तब्बल पाच टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के वाढीसह 591.90 रुपये किमतीवर क्लोज झाली आहे.

टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. टाटा समूहाच्या एखाद्या कंपनीचा आयपीओ तब्बल 19 वर्षांनंतर बाजारात येणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओला सेबीने तत्वतः मान्यता दिली आहे. या IPO चे स्वरूप हे ऑफर फॉर सेल अंतर्गत असेल. टाटा मोटर्स कंपनी या IPO च्या माध्यमातून आपले 20 टक्के भाग भांडवल खुक्या बाजारात विकणार आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या दोन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकानी माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रवासी वाहन उद्योगातील मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून ही मागणी प्रामुख्याने नवीन वाहने, विशेषत : एसयूव्ही आणि इलेक्ट्रिक वाहन या विभागांमध्ये पाहायला मिळाली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील वाहन विक्रीमध्ये 8 टक्के वाढ झाली होती, आणि कंपनीने 1,40,450 वाहनांची विक्री केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price today on 04 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या