3 May 2025 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Lancor Holdings Share Price | दणादण पैसा! 3 वर्षांत लँकर होल्डिंग्ज शेअरने 1600% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स, फायदा घेणार?

Lancor Holdings Share Price

Lancor Holdings Share Price | लँकर होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अफाट नफा मिळवून दिला आहे. 24 जुलै 2020 रोजी लँकर होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 50 रुपयेच्या वर पोहचला आहे. मागील 3 वर्षांत लँकर होल्डिंग कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअरधारकांना 1600 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे.

लँकर होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी लँकर होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 50.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअर्स तपशील :

लँकर होल्डिंग्ज कंपनीच्या शेअर धारकांना लवकरच मोफत बोनस शेअर्स मिळणार आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी लँकर होल्डिंग्ज कंपनीचे 2 शेअर्स धारण केले आहेत, त्यांना बोनस म्हणून एक शेअर मोफत मिळणार आहे. मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या कंपनीने बोनस शेअर्स जारी करण्यासाठी शुक्रवार, 18 ऑगस्ट ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लँकर होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 4.34 टक्क्यांच्या वाढीसह 53 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. लँकर होल्डिंग्ज कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट संबंधित व्यवसाय करते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये व्यावसायिक मालमत्तांचे भाडेपट्टी आणि संबंधित क्रियाकलाप सामील आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :

लँकर होल्डिंग्ज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 207 कोटी रुपये आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीचे शेअर्स सरासरी वार्षिक 160 टक्केने वाढले आहेत. 23 मार्च 2023 पर्यंतच्या लँकर होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे 62 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर उर्वरित भाग भांडवल परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी धारण केले होते.

मागील 3 वर्षात लँकर होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरधारकांना 1600 टक्के नफा कमावून दिला आहे. या तीन वर्षाच्या काळात रियल्टी इंडेक्समध्ये फक्त 166 टक्के टक्के पाहायला मिळाली आहे. 24 मार्च 2005 रोजी लँकर होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 6 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 30 जानेवारी 2009 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 9 रुपये होती. 30 एप्रिल 2020 रोजी हा स्टॉक 2.73 रूपये किमतीवर पोहचला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lancor Holdings Share Price today on 19 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Lancor Holdings Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या