17 May 2024 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

BIG BREAKING | मणिपूर हिंसाचारात भाजप सरकारचा सहभाग, सरकारच्या संगनमतामुळे हिंसाचार थांबत नाही, भाजप आमदाराने भांडं फोडलं

BIG BREAKING

Manipur Violence | ईशान्येकडील राज्यातील १० आदिवासी आमदारांपैकी एक असलेले मणिपूरचे भाजप आमदार पाओलिनलाल हाओकिप यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना पत्र लिहून राज्यातील कुकीबहुल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली होती अशी माहिती पुढे आली आहे.

भाजपचे स्थानिक आमदार हाओकिप यांनी ‘इंडिया टुडे’सोबत बोलताना या पत्राबाबत माहिती देताना म्हटले की, ‘निव्वळ जातीय हिंसाचार म्हणून सुरू झालेल्या हिंसाचाराचा वापर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘नार्को नक्षली’ विरुद्ध राज्याचे युद्ध असा चित्रित केला हे आम्ही स्पष्टपणे पाहिलं आहे. यावरून मणिपूरमधील सत्ताधारी पक्षच यामागे सामील होता हे उघड झालं आहे. भाजपच्या आमदारानेच राज्य सरकारचं बिंग फोडल्याने मोदी सरकार अजून अडचणीत आलं असून आता संपूर्ण ईशान्य भारतात मोदी सरकारविरोधात प्रचंड रोष वाढला आहे.

इंफाळ खोऱ्याच्या सभोवतालच्या पायथ्याशी असलेल्या कुकी-झो वस्त्यांवर हल्ला करून जाळण्यात कट्टरपंथी मैतेई मिलिशियाला मदत करण्यासाठी सरकारी शक्तींचा वापर करणे, असा ‘नार्को आतंकवादी’च्या कथेचा हेतू होता, असे आमदार पाओलिनलाल हाओकिप यांनी राज्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या राज्यघटनेतील अधिकारांसाठीच्या लढ्याबद्दल लिहिले आहे. ते दीर्घकालीन हिंसाचाराचे आणखी एक कारण ठरले आहे.

कुकी झो समाजाच्या वांशिक निर्मूलनाचे मुख्य सूत्रधार असलेल्या मैतेई लिपुन आणि आरामबाई टेंगगोल यांच्यासारख्या कट्टरपंथी गटांशी हातमिळवणी करण्यासाठी ते ओळखले जातात, असे सांगताना भाजप आमदाराने मुख्यमंत्र्यांना सुद्धा सोडले नाही. मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील सायकोटचे भाजप आमदार न्यूजलॉन्ड्रीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकीचे प्राधान्यक्रम ठरवले आहेत. मात्र, केवळ केंद्र सरकारच राज्यात शांतता प्रस्थापित करू शकेल असते, पण त्यांनी तसं केलं नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केला.

News Title : BIG BREAKING Manipur BJP MLA Paolienlal Haokip exposed violence facts check details on 24 July 2023.

हॅशटॅग्स

#BIG BREAKING(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x