2 May 2025 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Penny Stocks | उज्जीवन स्मॉल फायनान्स पेनी शेअर तेजीत, सहा महिन्यात 68 टक्के परतावा, तपशील वाचून निर्णय घ्या

Penny Stocks

Penny Stocks | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकच्या शेअरमध्ये बेसुमार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 49.13 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज देखील या बँकेच्या शेअरमध्ये भरघोस तेजी पाहायला मिळत आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 133 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील तीन ट्रेडिंग सेशम हा स्टॉक 15 टक्के वाढला आहे. सलग चौथ्या तिमाहीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरने 3.5 टक्क्यांहून अधिक ROA साध्य केला आहे. तर त्याच कालावधीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरने 30 टक्के ROE साध्य केला आहे. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.73 टक्के वाढीसह 50.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जून तिमाहीचे निकाल :

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने एप्रिल – जून 2023 तिमाहीत 60 टक्के वाढीसह 324 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या बुडीत कर्जात घट पाहायला मिळाली आहे. एप्रिल-जून 2022 या तिमाहीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने 203 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेने 1,464 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने 1,030 कोटी रुपये रुपये महसूल संकलित केला होता.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने जून 2022 च्या तिमाहीत 905 कोटी रुपये व्याज उत्पन्न नोंदवले होते. जे सध्याच्या तिमाहीत 1,287 कोटी रुपयेवर पोहोचले आहे. या बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 32 टक्क्यांच्या वाढीसह 793 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने उत्तम कामगिरी केली आहे.

जून 2023 तिमाहीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची सकल नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता 2.62 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत बँकेचा NPA 6.51 टक्के होता. बँकेचा निव्वळ NPA जून 2022 च्या तिमाहीत 0.11 टक्क्यांवरून घसरून जून 2023 मध्ये 0.06 टक्क्यांवर आला आहे.

HDFC सिक्युरिटीज फर्मने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँ केच्या शेअरवर 50 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती. ती बँकेने आज स्पर्श केली आहे. तज्ञांनी या बँकेच्या शेअरवर सुधारित लक्ष्य किंमतीसह ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

MK ग्लोबल फर्मने देखील उज्जीवन SFB बँक स्टॉकवर 58 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर JM Financial फर्मने Ujjivan SFB स्टॉकवर ‘बाय ‘ रेटिंग देऊन हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँके च्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि यासाठी त्यांनी 60 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of Ujjivan Small Finance Bank share Price on 01 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(606)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या