3 May 2025 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

TVS Supply Chain Solutions IPO | आला रे आला IPO आला! TVS सप्लाय चेन सोल्युशन्स IPO मध्ये गुंतवणूक करून मालामाल व्हा, तपशील पहा

TVS Supply Chain Solutions IPO

TVS Supply Chain Solutions IPO | चालू आठवड्यात अनेक कंपन्यांचे IPO लाँच होणार आहेत. IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा भरपूर उत्साहवर्धक राहणार आहे. लवकरच TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे.

सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीच्या IPO वर पैसे लावू शकता. या कंपनीचा IPO 10 ऑगस्ट 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. कंपनीच्या मुख्य प्रवर्तकांमध्ये TVS ग्रुप सारखा दिग्गज कंपनीचे नाव सामील आहे.

IPO ओपनिंग डिटेल :

TVS सप्लाई चेन सोल्युशन्स कंपनी मुख्यतः 4 विभागात व्यवसाय करते. ही कंपनी सप्लाय चेन सोल्यूशन्स, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो डीलरशिप, आफ्टर मार्केट सेल्स अँड सर्व्हिस संबंधित व्यवसाय करते. TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीचा IPO 14 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. इच्छुक गुंतवणुकदार TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीच्या IPO मध्ये 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान पैसे लावू शकतात.

अँकर गुंतवणूकदार 9 ऑगस्ट 2023 रोजी पासून गुंतवणूक करू शकतात. एप्रिल 2023 मध्ये TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीने सेबीकडे IPO संबंधित DRHP दाखल केला होता. आणि जुलै 2023 मध्ये कंपनीला आयपीओ लाँच करण्याची परवानगी मिळाली आहे.

IPO संबंधित डिटेल :

TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनी आपल्या IPO इश्यूद्वारे 600 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. यापूर्वी कंपनी IPO द्वारे 2,000 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत होती. आपल्या IPO अंतर्गत TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनी 1.42 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहे. या ऑफर फॉर सेल अंतर्गत, ओमेगा टीसी होल्डिंग्ज पीटीई लिमिटेड कंपनी आपले 1.07 कोटी शेअर्स विकणार आहे. तर टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस देखील आपले 9.84 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

सरगुणा राज् रविचंद्रन आपले 5.80 लाख शेअर्स IPO मध्ये विकणार आहेत, तर अँड्र्यू जोन्स 4 लाख शेअर्स आणि रामलिंगम शंकर आपल्या मालकीचे 3.15 लाख शेअर्स IPO मध्ये विकून प्रॉफिट बुक करणार आहेत. इथिराजन बाला आपले 5 लाख शेअर्स IPO मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहेत. TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 23 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TVS Supply Chain Solutions IPO details on 07 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

TVS Supply Chain Solutions IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या