Zen Technologies Share Price | मल्टिबॅगर झेन टेक्नॉलॉजी शेअर पुन्हा तेजीत! मागील 8 दिवसांत 44 टक्के परतावा दिला, खरेदी करावा?
Zen Technologies Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 869.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे.. मजबूत ऑर्डर बुक आणि जून 2023 तिमाहीतील जबरदस्त कामगिरीमुळे झेन टेक्नॉलॉजी या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे.
मागील आठ दिवसांत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा आठवड्यात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 883.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जून तिमाहीची कामगिरी :
जून 2023 तिमाहीत झेन टेक्नॉलॉजी कंपनीने मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 474 टक्क्यांच्या वाढीसह 47.13 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या जून तिमाहीत या कंपनीने 8.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे एकूण उत्पन्न देखील 35.38 कोटी रुपयेवरून वाढून 135.08 कोटी रुपयेवर पोहचले आहे. याशिवाय, व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई वार्षिक 414 टक्क्यांच्या वाढीसह 68.79 कोटी रुपयेवर पोहचली आहे. मागील आठवड्यात झेन टेक्नॉलॉजी कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून 64.97 कोटी रुपयेची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
झेन टेक्नॉलॉजी कंपनी मुख्यतः सेन्सर आणि सिम्युलेटर तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण प्रशिक्षण प्रणालीचे स्वदेशी डिझाइन, विकास आणि निर्मितीचे काम करते. झेन टेक्नॉलॉजी ही कंपनी.भारतीय संरक्षण मंत्रालय, सशस्त्र सेना, सुरक्षा दल पोलीस, निमलष्करी दले यांना प्रशिक्षण उपाय आणि अखंड सेवा प्रदान करण्याचे काम करते. झेन टेक्नॉलॉजी ही कंपनी लष्करी प्रशिक्षण सिम्युलेटर, ड्रायव्हिंग सिम्युलेटर, थेट श्रेणी उपकरणे, अँटी ड्रोन सिस्टीम बनवण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Zen Technologies Share Price today on 17 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकवर 'बाय' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा, यापूर्वी 1 वर्षात 351% परतावा दिला
- Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
- Smart Investment | जबरदस्त फायद्याची सरकारी योजना, 405 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
- Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार
- Infosys Share Price | इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 9 शेअर्स 'BUY' करावे की 'Sell'? मोठी अपडेट आली
- Hot Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 3 मिडकॅप स्टॉक, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग
- Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 29 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
- RVNL Share Price | PSU स्टॉक बुलेट ट्रेन गतीने वाढतोय, मागील 5 दिवसांत 33.50% परतावा दिला, फायदा घ्या
- Adani Enterprises Share Price | स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत! शेअर रॉकेट तेजीने वाढणार, स्टॉक 'BUY' करावा?
- Sansera Share Price | मालामाल करणारा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर, स्टॉक खरेदीला गर्दी, काय म्हटलं तज्ज्ञांनी?