1 May 2025 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Shoora Designs IPO | मार्ग श्रीमंतीचा! शूरा डिझाईन IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट केले, आता खरेदी करावा का?

Shoora Designs IPO

Shoora Designs IPO | शूरा डिझाईन कंपनीच्या आयपीओ लिस्टिंगच्या दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शूरा डिझाईन कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शूरा डिझाईन कंपनीचे शेअर्स 48 रुपये प्रति शेअर या इश्यू किमतीच्या तुलनेत 90 टक्के प्रीमियम वाढीसह 91.20 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये या कंपनीचे शेअर्स 95.76 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी शूरा डिझाईन कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 95.52 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IPO स्टॉक सबस्क्रिप्शन

शूरा डिझाईन या कंपनीच्या IPO ला तब्बल 64 पट अधिक सबस्क्रिप्शन प्राप्त झाले होते. या SME कंपनीच्या IPO ला गुंतवणुकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या कंपनीचा IPO जेवढे दिवस ओपन होता, तेवढ्या दिवसात त्याला एकूण 64 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 93.7 पट अधिक सबस्क्राईब करण्यात आला होता. यासह किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 34.68 पट अधिक सबस्क्राईब करण्यात आला होता.

कंपनीबद्दल थोडक्यात

शूरा डिझाईन्स ही कंपनी हिरे पुरवठादारांकडून हिरे खरेदी करते, आणि त्याला पैलू पडून घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना विकते. शूरा डिझाईन कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने गुजरात राज्यातील हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या सुरत शहराच्या आसपास केंद्रित आहे. शूरा डिझाईन कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 48 रुपये निश्चित केली होती. या IPO मध्ये कंपनीने पूर्णपणे फ्रेश शेअर्स इश्यू केले आहेत. IPO इश्यू अंतर्गत कंपनीने 4.24 लाख फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकले होते.

IPO तपशील

शूरा डिझाईन्स कंपनीचा IPO 17 ते 21 ऑगस्ट 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शूरा डिझाईन कंपनीने 24 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या गुंतवणुकदारांना शेअरचे वाटप केले होते. या कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग BSE SME इंडेक्सवर करण्यात आली आहे. IPO इश्यूअंतर्गत शूरा डिझाईन कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के कोटा राखीव ठेवला होता. आणि उरलेला 50 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shoora Designs IPO for investment today on 31 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Shoora Designs IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या