21 May 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये 'पॉवर' दाखवणार, तेजीचे संकेत, अमेरिकेतून कंपनीसाठी मोठी बातमी, फायदा घेणार?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी विक्रीच्या दबावात ट्रेड कडे होते. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. काल या कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के घसरणीसह 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये घसरण होणे थोडे आश्चर्यकारक होते कारण, काल टाटा पॉवर कंपनीला यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून एक चांगली बातमी मिळाली होती.

यूएस इंटरनॅशनल डेव्हलपर्मेट फायनान्स कॉर्पोरेशने तामिळनाडू राज्यात 4.3GW सौर सेल स्थापित करण्यासाठी टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीला 425 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात जवळपास 3,521 कोटी रुपयेची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 263.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित सोलर पॉवर प्लांटचे पहिले मॉड्यूल उत्पादन कार्य आर्थिक वर्षाच्या अखेरीस होणे अपेक्षित आहे. आणि पहिल्या सेलचे उत्पादन कार्य आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत पूर्ण होईल.

यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने तामिळनाडू राज्यात तिरुनेलवेली या ठिकाणी प्रस्तावित 4.3 GW क्षमतेचा सोलर सेल आणि ग्रीनफिल्ड एनर्जी प्रोजेक्टच्या मॉड्यूल उत्पादन प्रकल्पासाठी TP सोलर लिमिटेड या टाटा पॉवर कंपनीच्या उपकंपनीला 425 दशलक्ष डॉलर्स एवढा मदत निधी देण्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावित ऊर्जा निर्मिती प्लांटमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे 2,000 पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. यामध्ये बहुतांश कर्मचारी स्थानिक भागातील महिला देखील असतील.

बीएसई इंडेक्सवर सोमवारी टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. सोमवारी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 271.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरने इंट्राडेमध्ये 269.15 रुपये नीचांक किंमत आणि 274 रुपये इंट्राडे उच्चांक किंमत स्पर्श केली होती. 8 सप्टेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने 276.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती.

चालू आर्थिक वर्षाच्या जून 2023 या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 22 टक्के वाढीसह 972.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत टाटा पॉवर कंपनीला 784.6 कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला होता.

मागील आर्थिक वर्षांच्या जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 14,495.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जो मागील वर्षीच्या तुलनेत 5 टक्के वाढून 15,213.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. टाटा पॉवर कंपनीचा EBITDA मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 1,683.4 कोटी रुपये नोंवदला गेला होता, जो आता 75 टक्के वाढीसह 2,943.6 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 13 September 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x