2 May 2025 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Rajasthan BJP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठं खिंडार पडणार, वसुंधरा राजे समर्थक आमदार काँग्रेसच्या संपर्कात

Rajasthan BJP

Rajasthan BJP | आगामी काळात वसुंधरा राजे गटाचे अनेक आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच दिल्लीतील गुजरात लॉबी यंदा वसुंधरा राजे समर्थक आमदारांचं तिकीट कापणार असल्याचे वृत्त राजस्थान भाजपात पसरलं आहे. त्यामुळे जुन्या आणि वसुंधरा राजे गटाच्या नेत्यांना तिकीट गमवावे लागू शकते.

वसुंधरा राजे समर्थक आमदार काँग्रेसच्या संपर्कात

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विद्यमान ३० ते ४० आमदारांचे तिकीट कापण्याच्या विचारात आहे. त्यामुळे वसुंधरा राजे समर्थक आमदार मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री गेहलोत यांचे कौतुक करत आहेत. भाजप आमदारांकडून काँग्रेस कौतुकाची ही प्रक्रिया भाजपला मोठं खिंडार पडणार याचे स्पष्ट संकेत असल्याचं म्हटलं जातंय.

भाजप आमदार सूर्यकांत व्यास – सीएम गेहलोत यांचे कौतुक

राजस्थान काँग्रेस आमदार सूर्यकांत व्यास यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे जाहीर केलेले कौतुक भाजपने गांभीर्याने घेतले आहे. राज्याचे संघटन मंत्री चंद्रशेखर यांनी निवडणुकीच्या वर्षात अशा वक्तव्यांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलास मेघवाल यांना निलंबित केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ आमदार सूर्यकांत व्यास यांनी सीएम गेहलोत यांचे कौतुक केले आहे. जोधपूरमधून अनेकवेळा निवडणूक जिंकलेले सूर्यकांत व्यास म्हणाले, ‘गेहलोत यांनी राजे-महाराजांचे स्वप्न साकार करून उपकार केले.

कुलदेवी उस्त्र वाहिनी देवी मंदिराच्या नूतनीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी अंदाजपत्रकाची तरतूद केली, त्यामुळे अभिनंदन केले जाते. आता आमच्या समाजातील लोकांनी पोस्टर्स लावले तर मी काय करावे? असे ते म्हणाले. एकाबाजूला सीएम अशोक गेहलोत आणि आमदार सूर्यकांत व्यास यापूर्वी एकमेकांचे कौतुक करत आहेत. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

कैलास मेघवाल यांनी केले कौतुक

राजस्थान भाजप वेगवेगळ्या गटात विभागला गेल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. भाजपचे निलंबित आमदार कैलास मेघवाल यांनी ही कबुली दिली आहे. मेघवाल म्हणाले की, सध्या राजस्थान भाजपवर राजेंद्रसिंह राठोड गट, शेखावत गट, पूनिया गट आणि अर्जुन मेघवाल गटाचे वर्चस्व आहे. तर वसुंधरा राजे दुसऱ्या बाजूला पडला आहे.

आमदार कैलास मेघवाल यांनी आपण वसुंधरा राजे गटाचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पण मी झुकणार नाही. मी निवडणूक लढवणार आहे. मी जिंकणार सुद्धा. कैलास मेघवाल यांनी सीएम गेहलोत यांचे भरभरून कौतुक केले. मेघवाल म्हणाले की, 2018 मध्ये मोदी सरकारमुळे वसुंधरा राजे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या एका वक्तव्यामुळे गेहलोत सरकार पडण्यापासून वाचले, असा दावाही मेघवाल यांनी केला.

News Title : Rajasthan BJP MLA of Vasundhara Raje camp on way of congress 15 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rajasthan BJP(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या