4 May 2025 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
x

WPIL share Price | अल्पावधीत बक्कळ परतावा देतोय WPIL शेअर, हमखास पैसे दुप्पट होतील, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

WPIL share Price

WPIL share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये WPIL लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने लक्षणीय कामगिरी केली होती. मागील 6 महिन्यांत WPIL लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे. WPIL लिमिटेड कंपनीचे 28 मार्च 2023 रोजी 2178 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आता हा शेअर 3000 रुपयेच्या पार गेला आहे. या काळात WPIL लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी WPIL लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के वाढीसह 3,025.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

3 फेब्रुवारी 2023 रोजी WPIL लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1160 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 3000 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2086 कोटी रुपये आहे. WPIL लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3125 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1960 रुपये होती.

WPIL लिमिटेड कंपनीची स्थापना 1952 साली अमेरिकेच्या जॉन्स्टन पंप कंपनीने केली होती. WPIL लिमिटेड ही कंपनी मुख्यतः पंप स्पेअर पार्ट्स बनवण्याचे काम करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या ऑर्डर बूकचा आकार 3794 कोटी रुपये आहे.

WPIL लिमिटेड ही कंपनी पाणीपुरवठा प्रकल्पांचे काम करण्यात तज्ञ मानली जाते. ही कंपनी टर्नकी पाणी पुरवठा प्रकल्प संबंधित काम करते ज्याचा वापर औद्योगिक युनिट्स, वीज उपयोगिता आणि पाटबंधारे विभागांमध्ये केला जातो. WPIL कंपनीने कोलकाता, गाझियाबाद आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन युनिट सुरू केले आहेत.

WPIL कंपनीने 2011 पासून जागतिक बाजारपेठेत काम करायला सुरुवात केली होती. WPIL कंपनी जगभरात विविध पंप कंपन्यांचे अधिग्रहण करून आक्रमकपणे आपला व्यवसाय विस्तार करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. WPIL लिमिटेड कंपनीला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने 14.3 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती.

संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या या ऑर्डर अंतर्गत WIPL कंपनीला सेंट्रीफ्यूगल पंप संबंधित काम करायचे आहे. मागील एका वर्षात WIPL लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 122.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते वाढीचे संकेत आणि कंपनीला मिळत असलेल्या विविध ऑर्डरमुळे WPIL लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | WPIL share Price today on 20 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

WPIL Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या