7 May 2025 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया शेअरने तब्बल 3970 टक्के परतावा दिला, ऑर्डर्सबुक मजबूत, फायदा घ्या

Multibagger Stocks

Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधत असाल तर तुम्ही अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. या कंपनीच्या शेअरने आपल्या भरघोस कमाई करून दिली आहे. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीला नुकताच 832.70 कोटी रुपये मूल्याची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. Ahluwalia Contracts India Share Price

28 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 713.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3970 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड स्टॉक 1.74 टक्के घसरणीसह 704.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

नुकताच अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीला 832.40 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीला मॅक्स हेल्थ केअर ग्रुपकडून 832.40 कोटी रुपये मूल्याच्या दोन मोठ्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. पहिल्या ऑर्डरचे मूल्य 215.46 कोटी रुपये आहे. यामध्ये कंपनीला होमट्रेल बिल्डटेक प्रायव्हेट लिमिटेडसाठी एसएएस नगर मोहाली, पंजाब येथे ईपीसी तत्त्वावर मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीला 21 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तर दुसऱ्या ऑर्डरचे एकूण मूल्य 616.94 कोटी रुपये आहे. आणि यामध्ये मॅक्स हेल्थकेअर संस्थेने ईपीसी तत्त्वावर सेक्टर 56 गुरुग्राम हरियाणा याठिकाणी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्याचे काम कंपनीला दिले आहे. यासाठी कंपनीला 27 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

30 जून 2023 रोजी अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 18,412.5 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीला 5,259.50 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड ही कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी आणि कंत्राटी बांधकाम व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी भारतातील आपल्या ग्राहकांना आधुनिक पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याचे काम करते.

याशिवाय अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड कंपनी आपल्या सरकारी आणि खाजगी ग्राहकांसाठी निवासी, व्यावसायिक, पॉवर प्लांट, हॉस्पिटल, हॉटेल्स, आयटी पार्क, मेट्रो स्टेशन आणि डेपो बांधकामाचे देखील काम करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,782.24 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Ahluwalia Contracts India share price 30 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या