3 May 2025 9:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

NCC Share Price | मल्टिबॅगर NCC शेअर्सबाबत मोठी बातमी, या सकारात्मक बातमीने मल्टिबॅगर परतावा मिळणार?

NCC Share Price

NCC Share Price | NCC लिमिटेड या नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 161.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

1 सप्टेंबर 2023 रोजी NCC लिमिटेड स्टॉक 176.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी NCC लिमिटेड स्टॉक 0.093 टक्के घसरणीसह 160.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच NCC लिमिटेड कंपनीला 4206 कोटी रुपये मुक्याचे तीन नवीन कंत्राट मिळाले आहे. NCC लिमिटेड कंपनीने मंगळवारी सेबीला कळवले आहे की, कंपनीला सप्टेंबर 2023 मध्ये विविध केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांकडून 4,205.94 कोटी रुपये मूल्याचे तीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत.

या तीन कॉन्ट्रॅक्टमध्ये 819.20 कोटी रुपये मूल्याचे काम जल विभागाशी संबंधित आहे आणि 173.19 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट विद्युत विभागाच्या कामाशी संबंधित आहे. आणि 3213.55 कोटी रुपये मूल्याचे काम वाहतूक विभागाशी संबंधित आहे. एनसीसी लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला हे सर्व कामे राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध एजन्सींकडून देण्यात आले आहे.

NCC लिमिटेड ही कंपनी मुख्यतः बांधकाम, पायाभूत सुविधांचे विकास या क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचे बांधकाम कार्य देशभरात पसरलेले आहे. ही कंपनी इमारत, वाहतूक, पाणी आणि पर्यावरण, वीज पारेषण आणि वितरण, सिंचन, खाणकाम आणि रेल्वे प्रकल्प या संबंधित विकासाचा व्यवसाय करते. NCC लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी जून 2023 पर्यंत कंपनीचे 22 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी कंपनीचे अनुक्रमे 12.3 टक्के आणि 22.5 टक्के भाग भांडवल धारण केले होते. DII आणि म्युच्युअल फंडाने NCC लिमिटेड कंपनीचे एकूण 9.4 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांचा कंपनीतील एकूण वाटा 43.2 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NCC Share Price today on 04 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCC Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या