3 May 2025 7:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Plaza Wires Share Price | आयपीओ हलक्यात घेऊ नका! प्लाझा वायर्स IPO शेअरने पहिल्याच दिवशी 55% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त

Plaza Wires Share Price

Plaza Wires Share Price | प्लाझा वायर्स या वायर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. या कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. प्लाझा वायर्स कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला होता. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या कंपनीचा IPO पूर्ण सबस्क्राईब झाला होता.

अवघ्या 4 दिवसात प्लाझा वायर्स IPO एकूण 160 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. प्लाझा वायर्स कंपनीने आपल्या IPO अंतर्गत शेअरची किंमत बँड 54 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO स्टॉक BSE इंडेक्सवर 84 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

प्लाझा वायर्स IPO स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 55.56 टक्के नफा कमावून दिला आहे. प्लाझा वायर्स कंपनीचा IPO 29 सप्टेंबर 2023 ते 5 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO मध्ये QIB चा राखीव कोटा 42.84 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 388.09 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 37 4.81 पट खरेदी करण्यात आला होता. आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी प्लाझा वायर्स स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 84.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

प्लाझा वायर्स कंपनीने आपल्या IPO अंतर्गत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 1 कोटी 32 लाख 158 फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले होते. प्लाझा वायर्स कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून जमा होणारे पैसे नवीन प्लांट उभारण्यासाठी खर्च करणार आहे. शिल्लक रक्कम कंपनी आपल्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी खर्च करणार आहे.

प्लाझा वायर्स या कंपनीची स्थापना 2006 साली करण्यात आली होती. प्लाझा वायर्स या कंपनीचे जुने नाव नवरत्न वायर्स असे होते. ही कंपनी वायर्स आणि एलटी अॅल्युमिनियम केबल्सचे उत्पादन, विक्री आणि विपणन संबंधित व्यवसाय करते.

प्लाझा वायर्स कंपनी आपले उत्पादने फ्लॅगशिप ब्रँड प्लाझा केबल्स आणि होम ब्रँड अॅक्शन वायर्स आणि पीसीजी या ब्रँड नावाने विकते. प्लाझा वायर्स कंपनी जम्मू आणि काश्मीर, पंजाब, यूपी, उत्तराखंड, हरियाणा आणि तमिळनाडूमध्ये 20 पेक्षा जास्त सेवा केंद्रे चालवत आहे. 2 वर्षांपूर्वी प्लाझा वायर्स कंपनीने लघु सर्किट ब्रेकर आणि वितरण मंडळे सुरू करून आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये वाढ केली आहे.

31 मार्च 2023 पर्यंत प्लाझा वायर्स कंपनीकडे 1 हजार 249 पेक्षा जास्त अधिकृत डीलर आणि वितरक आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि यूपीमध्ये कंपनीच्या 3 शाखा कार्यालये चालू आहेत. तर महाराष्ट्रात कंपनीचे 1 शाखा कार्यालय आणि गोदाम आहे. आणि उत्तर प्रदेश, केरळ, आसाम राज्यात कंपनीची 4 गोदामे स्थित आहेत. यासह दिल्ली, पंजाब राज्यात कंपनीने CAF एजंट नियुक्त केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Plaza Wires Share Price NSE 13 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Plaza Wires Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या