14 May 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

Borosil Renewables Share Price | लोकं श्रीमंत झाली! 13 पैशाच्या पेनी शेअरची जादू, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 31 कोटी रुपये परतावा

Borosil Renewables Share Price

Borosil Renewables Share Price | बोरोसिल रिन्युएबल्स या विविध प्रकारच्या सोलर ग्लास बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

या काळात बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 13 पैशांवरून वाढून 400 रुपये किमतीवर पोहचले होते. बोरोसिल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 589.55 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 380.05 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी बोरोसिल रिन्युएबल्स स्टॉक 3.66 टक्के घसरणीसह 394.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

1 लाखावर दिला 31 कोटी परतावा
31 ऑक्टोबर 2003 रोजी बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 13 पैशावर ट्रेड करत होते. 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 405.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीच्या शेअर्सनी याकाळात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 312000 टक्के वाढवले आहेत.

जर तुम्ही 31 ऑक्टोबर 2003 रोजी बोरोसिल रिन्युएबल कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 31.12 कोटी रुपये झाले असते. मागील 10 वर्षात बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4600 टक्के परतावा कमावून दिला आहे.

25 ऑक्टोबर 2013 रोजी बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 8.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 405.85 रुपये किमतीवर पोहचली होती. जर तुम्ही 25 ऑक्टोबर 2013 रोजी बोरोसिल रिन्युएबल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 47.02 लाख रुपये झाले असते. मागील 3 वर्षात बोरोसिल रिन्युएबल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 340 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Borosil Renewables Share Price NSE 26 October 2023.

हॅशटॅग्स

#Borosil Renewables Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x