3 May 2025 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा निर्णय, या निर्णयाचा शेअरवर काय परिणाम होणार? स्टॉक तेजीत येणार?

Reliance Share Price

Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी स्थानिक चलन रोख्यांच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 1.8 अब्ज डॉलर्स भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. जर रिलायन्स कंपनीने ही भांडवल उभारणी केली तर ती चलन रोख्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली सर्वात मोठी बाँड विक्री ठरेल.

2020 नंतर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आपले पहिले देशांतर्गत बाँड जारी करून भांडवल उभारणी करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.22 टक्के वाढीसह 2,325.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी चलन बाँड इश्यू करून भांडवल उभारणी करणार आहे. चलन बाँड म्हणजे एक प्रकारचे कर्ज सिक्युरिटीज असतात. हे विशिष्ट देशाच्या स्थानिक चलनात नामांकित केले जातात. हे चलन बाँड सामान्यत: सरकार, कॉर्पोरेशन किंवा संस्थांद्वारे भांडवल उभारणीसाठी जारी केले जातात. यात बाँडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना व्याज स्थानिक चलनात दिले जाते.

परकीय चलन बॉण्ड्स हे परकीय चलनात डिनोमिनेटेड असतात. आणि त्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना व्याज परकीय चलनात दिले जाते. स्थानिक चलन बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना बाँड जारीकर्त्याच्या क्रेडिट जोखीम तसेच देशांतर्गत व्याजदरात होणाऱ्या बदलांमधील जोखमीचा विचार करावा लागतो.

मीडिया रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आपला तेल आणि वायू व्यवसाय, रिटेल, दूरसंचार, ऊर्जा आणि वित्त क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला भांडवलाची गरज लागणार आहे.

भांडवल उभारणी करण्यासाठी रिलायन्स रिटेल कंपनी देखील आपले शेअर्स विकून कतार गुंतवणूक प्राधिकरण आणि केकेआर अँड कंपनी सारख्या धोरणात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारणी करत आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 2325 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला CRISIL रेटिंग एजन्सीने AAA क्रेडिट रेटिंग प्रदान केले आहे. ही क्रेडिट रेटिंग टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या एए रेटिंगपेक्षा चांगली मानली जाते. तथापि, मूडीज आणि फिचने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला अनुक्रमे Baa2 आणि BBB रेटिंग प्रदान केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE 03 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या