3 May 2025 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर! यापूर्वी दिला 7777 टक्के परतावा, खरेदीनंतर संयम पाळल्यास आयुष्य बदलेल

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह 172 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशोक लेलँड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50370 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 191 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 133 रुपये होती. या कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यात अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 145 रुपयेवरून ते 172 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. 3 एप्रिल 2020 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 38 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरुन हा स्टॉक 400 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी अशोक लेलँड स्टॉक 1.97 टक्के वाढीसह 173.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

1 जानेवारी 1999 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 2.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक आतापर्यंत 7529 टक्के वाढला आहे. अशोक लेलँड कंपनीने स्विच मोबिलिटी कंपनीमध्ये 1200 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अशोक लेलँड ही चेन्नई स्थित व्यावसायिक वाहन बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीची उपकंपनी असलेल्या स्विच मोबिलिटीमध्ये 1200 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

अशोक लेलँड कंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठी खेळी खेळण्याचा विचार करत आहे. गुरुवारी अशोक लेलँड कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा गुंतवणूकीचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. अशोक लेलँड ही कंपनी ब्रिटन आणि भारतात स्विच मोबिलिटी कंपनीमध्ये 1200 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक केल्यावर अशोक लेलँड कंपनीची उत्पादने ऑफर, संशोधन आणि विकास क्रियाकलाप आणि ऑपरेशनल क्षमता मजबूत होण्यास मदत होईल. अशोक लेलँड कंपनी पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्यांत ही गुंतवणूक करणार आहे.

स्विच मोबिलिटी कंपनी प्रायव्हेट इक्विटी इको सिस्टीमद्वारे भांडवल उभारणीचे काम करत आहे. स्विच मोबिलिटी लिमिटेड यूके आणि स्विच मोबिलिटी ऑटोमॅटिक इंडिया कंपनीने स्विच मोबिलिटी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भाग भांडवल धारण केले आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक बस आणि हलकी व्यावसायिक वाहने बनवण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. स्विच मोबिलिटी कंपनीच्या भारतीय शाखेकडे 800 इलेक्ट्रिक बस असून त्यांच्याकडे 1200 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.

मागील वर्षी या कंपनीने भारतात आपली पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस लाँच केली होती. सप्टेंबर 2023 मध्ये, स्विच मोबिलिटी कंपनीने कटिंग एज इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हेइकल देखील लाँच केली होती. या कंपनीकडे सध्या 13000 E-LCV बनवण्याची ऑर्डर प्रलंबित आहे. स्विच मोबिलिटी कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीपासून इलेक्ट्रिक लाईट व्यावसायिक वाहनांचा पुरवठा करायला सुरुवात करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE 11 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या