
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये पुन्हा एकदा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून येस बँक स्टॉक तेजीत वाढत होता, मात्र आज हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 2.23 टक्के घसरणीसह 19.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच येस बँकेने सेबीला कळवले होते की, जेसी फ्लॉवर्स एआरसी कंपनीला एनपीए विकून येस बँकेने 120 कोटी रुपये मिळवले आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. येस बँकेने सप्टेंबर 2023 तिमाहीत वर्ष-दर-वर्ष आधारे जबरदस्त कमाई केली आहे. या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात तब्बल 50 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
येस बँकेने सप्टेंबर तिमाहीत 47.4 टक्के वाढीसह 225.21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात येस बँकेने 152.82 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 3.3 टक्क्यांच्या वाढीसह 1925 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
मागील एका महिनाभरात येस बँकेच्या शेअरमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली आहे. अवघ्या एका महिन्यात येस बँकेच्या शेअरची किंमत 16 रुपये वरून 20 रुपयेवर पोहोचली आहे. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 14.40 रुपये होती. तर उच्चांक परकी किंमत 24.75 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.