Penny Stocks | फक्त 7 रुपायाचा शेअर! हा पेनी स्टॉक करेल मालामाल, फ्री बोनस शेअर्स जाहीर होण्याची शक्यता
Penny Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधत असाल तर तुम्ही इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावू शकता. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
22 नोव्हेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 2.74 टक्क्यांच्या घसरणीवसह 7.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.10 टक्के घसरणीसह 7.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 27 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करू शकतात. 17 नोव्हेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीने घोषणा केली होती की, तिच्या Agro व्यवसायाला भारतातील अग्रगण्य कंपनी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड आणि तिची साहित्य उपकंपनी असलेल्या हिमालयन बायो ऑर्गन फूड्स लिमिटेड कंपनीकडून 150 दशलक्ष रुपये आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आले आहेत.
इंटेग्रा एसेंशिया कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 17.11 टक्के वाढीसह 6689.71 लाख रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 5712.55 लाख रुपये महसूल संकलित केेला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इंटेग्रा एसेंशिया कंपनीने 248.71 टक्के वाढीसह 752.79 लाख रुपये PAT नोंदवला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 215.88 लाख रुपये PAT नोंदवला होता. कंपनीचे PAT मार्जिन या तिमाहीत वाढून 10.07 टक्केवर पोहचले आहेत. तर मागील वर्षी ते 3.63 टक्के होते. कंपनीचा EBITDA मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत 211.11 लाख रुपये होता, जो या तिमाहीत 420.98 टक्के वाढीसह 1099.84 लाख रुपयेवर पोहचला आहे.
मागील एका महिन्यात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे . मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 12 टक्के घसरले आहेत.
मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 460 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1805 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks of Integra Essentia Share Price 24 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Avanti Feeds Share Price | 1 रुपयाच्या शेअरने करोडपती बनवलं, मालामाल करणारा शेअर खरेदी करा
- Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
- Smart Investment | जबरदस्त फायद्याची सरकारी योजना, 405 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
- BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
- Penny Stocks | हे टॉप 7 चिल्लर प्राईस पेनी स्टॉक श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट, फायदा घेणार?
- RVNL Share Price | PSU स्टॉक बुलेट ट्रेन गतीने वाढतोय, मागील 5 दिवसांत 33.50% परतावा दिला, फायदा घ्या
- HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल?
- Sansera Share Price | मालामाल करणारा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर, स्टॉक खरेदीला गर्दी, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
- Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक तगडा परतावा देणार, फायदा घ्या