2 May 2025 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Adani Port Share Price | एका महिन्यात 32% परतावा देणारा अदानी पोर्ट शेअर अजून तेजीत येणार? स्टॉकबाबत महत्वाची अपडेट

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पोर्ट कंपनीने आपली उपकंपनी अदानी एन्नोर कंटेनर टर्मिनल कंपनीमधील 49 टक्के भाग भांडवल 247 कोटी रुपये किमतीला विकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अदानी पोर्टस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1079 रुपये किमतीवर ओपन झाले होते. मागील एका महिन्यात अदानी पोर्ट्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट स्टॉक 0.31 टक्के वाढीसह 1,078 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

नुकताच अदानी पोर्ट कंपनीने 14 डिसेंबर 2023 रोजी टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीची अप्रत्यक्ष उपकंपनी असलेल्या आणि मेडिटरेनियन शिपिंग कंपनीची सहयोगी कंपनी असलेल्या मुंडी लिमिटेड कंपनीला अदानी एन्नोर कंटेनर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड मधील 49 टक्के भाग भांडवल विकण्याची घोषणा केली होती.

अदानी पोर्ट्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे JV अदानी इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल कंपनीच्या यशावर आधारित आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या खाजगी व्यावसायिक बंदर असलेल्या मुद्रा बंदर येथे CT3 कंटेनर टर्मिनलच्या हतळणीचे काम करते.

अदानी पोर्ट्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदराची लांबी 400 मीटर आहे. आणि या बंदरांची वार्षिक हाताळणी क्षमता 0.8 दशलक्ष TEU आहे. टर्मिनलची सवलतीची मुदत 2044 मध्ये संपणार आहे. त्यांची वार्षिक क्षमता 1.4 दशलक्ष TEU पर्यंत वाढण्यास सक्षम आहे.

अदानी पोर्ट कंपनीची TIL आणि MSC सोबतची व्यावसायिक भागीदारी ही परस्पर विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारित असणार आहे. एन्नोर कंटेनर टर्मिनल येथे AICTPL टर्मिनलची प्रतिकृती बनवणे आणि दक्षिण भारतीय बाजारपेठेत आपल्या व्यावसायिक गरजा भागवणे हे अदानी पोर्ट कंपनीचे मुख्य ध्येय आहे.

अदानी पोर्ट कंपनीने जगातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपनीसोबत केलेला सहकार्य करार कंपनीचा मजबूत दृष्टिकोन आणि पारदर्शक व्यावसायाचे प्रतिबिंब दर्शवत आहे. या सहकार्यामुळे अदानी पोर्ट कंपनी जागतिक बंदर व्यवसायात आपली उपस्थिती मजबूत करण्यास सक्षम होईल. AECTPL चे एकूण बाजार भांडवल 1,211 कोटी रुपये आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अदानी पोर्ट कंपनीचे AECTPL कंपनीमध्ये 51 टक्के भाग भांडवल शिल्लक राहील. हा व्यवहार पुढील तीन ते चार महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE 16 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या