2 May 2025 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH
x

Tata Motors Share Price | LIC ने टाटा मोटर्स शेअर्स विकून नफा बुक केला, रिटेल गुंतवणुकदारांनी काय करावे? पुढे फायदा?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीने टाटा मोटर्स कंपनीमधील भाग भांडवल कमी करण्याचा निर्णय घेतला होता. एलआयसी कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीमधील भाग भांडवल 5.110 टक्क्यांवरून कमी करून 3.092 टक्क्यांवर आणले आहे. म्हणजेच सध्या एलआयसी कंपनीकडे टाटा मोटर्स कंपनीचे 10.27 कोटी इक्विटी शेअर्स शिल्लक राहिले आहेत.

पूर्वी LIC कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे 16.98 कोटी इक्विटी शेअर्स होते. म्हणजेच आता LIC कंपनीने टाटा मोटर्स कंपनीचे 6.72 कोटी शेअर्स विकून नफा वसुली केली आहे. आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 706.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेबीच्या नियमांनुसार, LIC कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी कंपनीने टाटा मोटर्स कंपनीमधील आपली शेअर होल्डिंग 169,802,847 वरून कमी करून 102,752,081 इक्विटी शेअर्सवर आणली आहे. आता LIC कंपनीची शेअर होल्डिंग 5.110 टक्क्यांवरून 3.092 टक्क्यांवर आली आहे.

28 ऑगस्ट 2015 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत LIC कंपनीने टाटा मोटर्स कंपनीमधील शेअर होल्डिंगमध्ये 2 टक्क्यांनी कमी केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीचे शेअर्स 0.80 टक्क्यांच्या घसरणीसह 794.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

स्टॉक घसरणीमुळे LIC कंपनीचे बाजार भांडवल 5,03,817.69 कोटी रुपयेवरून 5.29 लाख कोटी रुपयेवर आले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 729.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टाटा मोटर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,42,283.87 कोटी रुपये आहे. नुकताच एलआयसी कंपनीने हिरो मोटोकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स देखील विकले आहेत.

LIC कंपनीने आपली हिरो मोटोकॉर्प कंपनीमधील शेअर होल्डिंग 22,491,571 वरून कमी करून 18,482,495 वर आणली आहे. या विक्रीसह LIC कंपनीचा हिस्सा 11.252 टक्क्यांवरून 9.246 टक्क्यांवर आला आहे. 13 जून 2022 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत LIC कंपनीची शेअर होल्डिंग 2 टक्क्यांनी घटली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE 21 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या