7 May 2025 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

Aster DM Share Price | अल्पावधीत 97 टक्के परतावा देणाऱ्या शेअर्सवर आता 80 टक्केपर्यंत डिव्हीडंड मिळू शकतो

Aster DM Share Price

Aster DM Share Price | सध्या जर तुम्ही लाभांश देणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना दर्शनी मूल्यावर 70 ते 80 टक्के लाभांश देऊ शकते. मागील 5 वर्षांपासून या कंपनीने आपल्या शेअरधारकांना लाभांश दिला नाहीये. मात्र आता एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीच्या लाभांश वाटपाची बातमी समोर येताच कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 449.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी एस्टर डीएम हेल्थकेअर स्टॉक 2.15 टक्के वाढीसह 434.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारी एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीने सेबीला कळवले की, एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी एफझेडसी मधील आपला हिस्सा अल्फा जीसीसीला विकण्यासाठी चर्चा करत आहे. या विषयावर समाधानकारक चर्चा झाल्याची माहिती एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीने सेबीला कळवली आहे.

28 नोव्हेंबर 2023 रोजी एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीने माहिती दिली होती की, हा संपूर्ण करार 1.01 अब्ज डॉलर्समध्ये संपन्न होऊ शकतो. त्यापैकी 903 दशलक्ष डॉलर्स व्यवहार पूर्ण झाल्यावर मिळतील. आणि उर्वरित 98.8 दशलक्ष डॉलर्स टप्प्याटप्प्यात दिले जातील.

एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी हा प्रलंबित व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करू शकते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. BSE निर्देशांकावर हा स्टॉक 440 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

मागील एका वर्षात एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 97 टक्के परतावा कमावून दिला आहे. एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीची स्थापना 1987 साली दुबईमध्ये झाली होती. एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी सध्या 33 रुग्णालये, 127 दवाखाने, 527 फार्मसी आणि 220 लॅब हाताळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aster DM Share Price NSE Live 17 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Aster DM Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या