17 June 2024 7:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

HUDCO Share Price | शेअर सुसाट तेजीत! मागील 3 महिन्यांत दिला 173 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या

HUDCO Share Price

HUDCO Share Price | हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच हुडको कंपनीच्या शेअर्समध्ये शेअर्स गुरुवारी अप्पर सर्किट लागला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी हुडको कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 207 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी हुडको स्टॉक 0.92 टक्के वाढीसह 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील एका वर्षभरात हुडको कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भाड्याने, चाळीत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठी भारत सरकार एक गृहनिर्माण योजना बनवणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लोक आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील.

29 मार्च 2023 रोजी हुडको कंपनीचे शेअर्स 40.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 411 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील एका वर्षात हुडको कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 324 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 173 टक्क्यांनी वाढली आहे.

हुडको कंपनीचे 54.40 टक्केपेक्षा जास्त भाग भांडवल भारत सरकारने धारण केले आहे. यासह एलआयसी ने हुडको कंपनीचे 8.9 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 11.9 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. परकीय संस्था आणि परकीय गुंतवणूकदार यांचा हुडको कंपनीतील वाटा 9.1 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HUDCO Share Price NSE Live 02 February 2024.

हॅशटॅग्स

Hudco Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x