1 November 2024 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

Latent View Share Price | AI संबंधित कंपनीचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय? अपडेटनंतर खरेदी वाढली

Latent View Share Price

Latent View Share Price | लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाने डिसीजन पॉइंट कंपनीमध्ये 70 टक्के भाग भांडवल खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 39.1 दशलक्ष डॉलर्स असेल. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनीचे शेअर्स 2.92 टक्के वाढीसह 522.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनी अंश )

लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनीने डिसीजन पॉइंट कंपनीचे 70 टक्के भाग भांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. आणि उर्वरित 30 टक्के भाग भांडवल पुढील दोन वर्षांत अधिग्रहण करण्याची योजना लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनीने मांडली आहे. या गुंतवणूकीचा उद्देश कंपनीच्या महसूल संकलनात वाढ करणे, आणि कंपनीच्या व्यवस्थापन क्षमतांमध्ये सुधारणा करणे, तसेच लेटेंट व्ह्यू कंपनीचे CPG अनुलंब विस्तृत करणे आणि नवीन ग्राहक मिळवून विविध व्यवसाय विभागात एन्ट्री करण्याचा उद्देश आहे.

लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनी डिसीजन पॉइंट कंपनीचे अधिग्रहण करून डेटा इंजिनीअरिंग, डेटा सायन्स, डेटा व्हिज्युअलायझेशन तसेच विश्लेषण आणि GenAI सल्लागार अशा विविध आयटी सेवां संबंधित विभागात व्यवसाय विस्तार करणार आहे. डिसिजन पॉइंट ही कंपनी CPG ग्राहकांसाठी AI सक्षम रेव्हेन्यू ग्रोथ मॅनेजमेंट सोल्यूशन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

मागील एका वर्षात लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात या कंपनीचे शेअर्स 13.25 टक्के मजबूत झाले आहेत. 9 फेब्रुवारी 2024 रोजी लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनीचे शेअर्स 544.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.

29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 311.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स कंपनीचा IPO 2021 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या शेअर्सची इश्यू किंमत 197 रुपये होती. लॅटेंट व्ह्यू ॲनालिटिक्स ही कंपनी मुख्यतः विश्लेषण रोडमॅप विकसित करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Latent View Share Price NSE Live 01 April 2024.

हॅशटॅग्स

Latent View Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x