1 May 2025 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आजपासून म्हणजेच 8 एप्रिल 2024 पासून तीर्थ गोपीकॉन कंपनीचा IPO ( सार्वजनिक प्रस्ताव ) गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ही कंपनी आपल्या IPO द्वारे 44.40 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. ( तीर्थ गोपीकॉन अंश )

तीर्थ गोपीकॉन कंपनी NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध होण्यासाठी 39.99 लाख इक्विटी शेअर्स 111 रुपये किमतीवर जारी करणार आहे. या कंपनीचे IPO शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये 18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक 129 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

तीर्थ गोपीकॉन लिमिटेड कंपनीचा IPO 8 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये एकूण 1200 शेअर्स ठेवले आहेत. हा एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना 1.33 लाख रुपये जमा करावे लागतील. IPO इश्यूद्वारे जो निधी जमा होईल, त्याचा वापर खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे.

तीर्थ गोपीकॉन कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या 10 महिन्यांत 69.70 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 7.84 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. 31 जानेवारी 2024 पर्यंत या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 904.98 कोटी रुपये होता. या कंपनीने आपल्या IPO इश्यूसाठी लीड मॅनेजर म्हणून ‘इंटरएक्टिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीला नियुक्त केले आहे.

तीर्थ गोपीकॉन लिमिटेड ही कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी, बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या विकासा संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी मुख्यत्वे रस्ते, सीवरेज आणि पाणी वितरण प्रकल्पांच्या कामात एक्स्पर्ट मानली जाते. या कंपनीची स्थापना 2019 साली झाली होती. तीर्थ गोपीकॉन कंपनीने मध्य प्रदेशात रस्ते बांधणी, सीवरेज आणि पाणीपुरवठा या सारखे अनेक प्रकल्प पूर्ण केले आहे. या कंपनीचा मुख्य व्यवसाय मध्य प्रदेश राज्यात आणि इंदूर, छतरपूर, सागर, दिंडोरी, जबलपूर आणि उज्जैन या शहरांमध्ये केंद्रित झाला आहे. आता कंपनी हळूहळू इतर राज्यांमध्येही व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Teerth Gopicon IPO 08 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या