1 November 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, 6 पटीने वाढतोय पैसा, करोडपती करतेय ही SBI फंडाची योजना Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 3 शेअर्स खरेदी करा, स्टॉक खरेदीला गर्दी, रोज 20% अप्पर सर्किट हिट PPF Investment | PPF मधील महिना बचत मॅच्युरिटीला देईल 41 लाख रुपये परतावा, असा मिळाला मोठा फायदा - Marathi News Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल EPF Withdrawal | 90% नोकरदारांना माहित नाही, कंपनीच्या परवानगीशिवाय EPF खात्यातून पैसे कसे काढायचे, ट्रिक जाणून घ्या Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा शेअर तेजीने परतावा देणार, स्टॉक खरेदीला गर्दी, मजबूत कमाई होणार - NSE: PATELENG
x

Paytm Share Price | पेटीएम शेअर्सची घसरण वाढली, स्टॉक घसरणीचे कारण काय? पुढे काय होणार?

Paytm Share Price

Paytm Share Price | मागील काही दिवसापासून पेटीएम कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. 9 एप्रिल रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेने एक मोठी अपडेट जाहीर केली. पेटीएम पेमेंट्स बँकेचे सीईओ आणि एमडी सुरिंदर चावला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ( पेटीएम कंपनी अंश )

One97 Communications कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली की, 8 एप्रिल 2024 रोजी PPBL चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO सुरिंदर चावला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पेटीएम स्टॉकमध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी पेटीएम स्टॉक 1.09 टक्के घसरणीसह 399.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 1.87 टक्क्यांच्या घसरणीसह 404.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 5 दिवसांत पेटीएम स्टॉक 3.26 टक्के कमजोर झाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सुरिंदर चावला यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे आणि करिअरच्या नवीन संधी शोधण्यासाठी आपल्या राजीनामा दिला आहे. 26 जून 2024 रोजी सुरिंदर चावला यांना कामावरून मुक्त करण्यात येईल.

सुरिंदर चावला यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून 1 वर्ष आणि 3 महिने काम केले आहे. यापूर्वी सुरिंदर चावला यांनी जवळपास 9 वर्षे 9 महिने RBL बँकेचे शाखा बँकिंग प्रमुख पदाची जबाबदारी हाताळली होती. त्यापूर्वी सुरिंदर चावला यांनी HDFC लिमिटेड बँकेत 11 वर्षे 6 महिने काम केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price NSE Live 10 April 2024.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x