4 May 2025 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

Shukra Rashi Parivartan | 'या' 5 नशीबवान राशींमध्ये तुमची राशी आहे? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत शुभं आणि फलदायी

Shukra Rashi Parivartan

Shukra Rashi Parivartan | ज्योतिषीय गणनेनुसार वैशाख महिना 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या दिवशी दैत्यांचे गुरू शुक्रदेव आपली चाल बदलतील. सध्या शुक्र मीन राशीत विराजमान असून 24 एप्रिल 2024 रोजी मेष राशीत प्रवेश करेल. याचा परिणाम घरानुसार सर्व राशींवर होईल. यातील अनेक राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे. अनेक राशींना खरे प्रेम मिळू शकते. ज्योतिषींनुसार कुंडलीत शुक्र बलवान असताना व्यक्तीला सर्व प्रकारचे सांसारिक सुख प्राप्त होते. जाणून घेऊया भाग्यशाली राशींबद्दल..

ज्योतिषींनुसार शुक्र 24 एप्रिल रोजी रात्री 11 वाजून 58 मिनिटांनी मीन राशीतून बाहेर पडेल आणि मेष राशीत प्रवेश करेल. शुक्र 19 मे 2024 पर्यंत या राशीत राहील. या दिवशी सकाळी 08 वाजून 43 मिनिटांनी शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल.

कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना शुक्राच्या राशी परिवर्तनाचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. दांपत्य जीवनात रोमान्स राहील. तुम्हाला खूप आत्मविश्वास वाटेल. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. धर्माविषयी ची आवड वाढेल. भागीदारीत लाभ मिळण्याची ही शक्यता आहे. हातात पैसा येण्याचे नवे मार्ग खुले होण्याचा योग आहे.

धनु राशी
शुक्राचा मीन राशीत प्रवेश धनु राशीच्या जातकांना भाग्य मिळवून देऊ शकतो. शुक्राने आपल्या राशीच्या चौथ्या भावात भ्रमण केले आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. अशावेळी शुक्राच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रवासात फायदा होईल. आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील. घरात पैसा येण्यासाठी इतर मार्ग देखील खुले होऊ शकतात.

सिंह राशी
शुक्राचे मीन राशीतील संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला जाणार आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पैशाची आवक होईल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यापारी, कला, प्रसारमाध्यमे आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींसाठी काळ शुभ राहील. कुटूंबाच्या आर्थिक भरभराटीसाठी नवे योग निर्माण होण्यासाठी अत्यंत शुभं काळ असेल.

मिथुन राशी
मेष राशीतील संक्रमणादरम्यान शुक्र मिथुन राशीच्या उत्पन्न भावात विराजमान राहील. या घरात शुक्राच्या उपस्थितीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होईल. त्याचबरोबर अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसेही मिळू शकतात.

मीन राशी
शुक्र मीन राशीत श्रेष्ठ आहे. त्यामुळे शुक्र या राशीच्या लोकांना नेहमीच शुभ फळ देतो. सध्या राहू मीन राशीत विराजमान आहे. राशी परिवर्तनादरम्यान शुक्र मीन राशीच्या धनघरात विराजमान असेल. यामुळे मीन राशीच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात अनाकलनीय नफा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर योग्य वेळ येईल.

News Title : Shukra Rashi Parivartan Effect on these 5 zodiac signs 11 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shukra Rashi Parivartan(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या