4 May 2025 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

IREDA Share Price | एकदिवसात 87% परतावा देणाऱ्या IREDA शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, स्टॉक चार्टवर कोणते संकेत?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 166.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आयआरईडीए स्टॉक 32 रुपये या इश्यू किमतीच्या तुलनेत 421 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.53 टक्के वाढीसह 168.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयआरईडीए कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या सरकारी कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबर 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 49.99 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या दिवशी आयआरईडीए स्टॉक 59.99 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 87 टक्के वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. 10 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 166.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आयआरईडीए कंपनीच्या IPO चा आकार 2150 कोटी रुपये होता. या कंपनीचा IPO 38 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मधे किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 7.73 पट सबस्क्राईब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 24.16 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा कोटा 104.57 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

या कंपनीच्या IPO मध्ये कर्मचाऱ्यांचा राखीव कोटा 9.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 460 शेअर्स ठेवले होते. एका लॉटचे मूल्य 14720 रुपये होते. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 12 April 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या