5 May 2024 10:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
x

अनु 'वाद' तुटला, महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अभिभाषणं थेट गुजराती भाषेत.

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांच अभिभाषण मराठीऐवजी गुजराती भाषेतील अनुवाद सभागृहातील आमदारांच्या कानावर पडला. मुख्यमंत्र्यांनी मागितली असली तरी विरोधकांनी संताप व्यक्त करत पहिल्याच दिवशी सभात्याग केला.

मुख्यमंत्री सभागृहाची माफी मागून पुढे म्हणाले की हा विषय सभापतींच्या अखत्यारीतला असला तरी दोषींची गय केली जाणार नाही. आज संध्याकाळपर्यंत जवाबदार व्यक्तींवर कारवाई करून त्यांना घरी पाठवण्यात यावं.

आज सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात होताच, राज्यपालांचे हे अभिभाषण सभागृहातील उपस्थित आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाले असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. नंतर या सगळ्या लाजिरवाण्या प्रकारानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. परंतु झालेल्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली असून राज्यपालांना घडल्या प्रकारची चौकशी करण्याची सूचना केली आहे.

सभागृहात नक्की घडलं काय ?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ही नेहमी राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. परंतु राज्यपाल जेव्हा अभिभाषण इंग्रजी मध्ये करतात तेव्हा त्या इंग्रजी अभिभाषणाचा मराठीत अनुवाद केला जातो. परंतु इतकी वर्ष घडत आलेल्या प्रथा आज मोडीत निघाल्या कारण ते अभिभाषण मराठीत नाही तर चक्क गुजरातीत ऐकू आला. परंतु शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या ते लक्ष्यात येताच त्यांनी नियंत्रण कक्षाकडे धाव घेत तेथून मराठीत अनुवाद करायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी मागितली असली तरी विरोधकांनी संताप व्यक्त करत पहिल्याच दिवशी सभात्याग केला. मुख्यमंत्री सभागृहाची माफी मागून पुढे म्हणाले की हा विषय सभापतींच्या अखत्यारीतला असला तरी दोषींची गय केली जाणार नाही. आज संध्याकाळपर्यंत जवाबदार व्यक्तींवर कारवाई करून त्यांना घरी पाठवण्यात यावं.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x