3 May 2025 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मोठी टार्गेट प्राईस गाठणार, सतत अप्पर सर्किट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. दरम्यान या कंपनीचे शेअर्स 49.29 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीला मिळालेली ही चौथी ऑर्डर आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 220 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1200 टक्के वाढली आहे. आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.61 टक्के वाढीसह 49.52 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला AMPIN एनर्जी ट्रान्झिशन कंपनीकडून 103.95 MW ची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी 3.1 मेगावॅट क्षमतेचे 33 पवन ऊर्जा टर्बाइन पुरवणार आहे. ही ऑर्डर सुझलॉन एनर्जी कंपनीच्या 3 मेगावॅट उत्पादन लाइनमधील S144-140 टर्बाइन संबंधित आहे.

या प्रकल्पाची उभारणी राजस्थानच्या फतेहगढ जिल्ह्यात केली जाणार आहे. हा प्रकल्प SECI अंतर्गत असलेल्या संकरित प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीजेची क्षमता एवढी असेल की, ती 85,000 घरांना पुरवली जाऊ शकते. यामुळे दरवर्षी 3.38 लाख टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होणार आहे.

नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीचे स्वतंत्र संचालक मार्क डेसडीलीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मार्क डेसडीलीर मागील 18 महिन्यांत कंपनीने नोंदवलेल्या ऑपरेशनल आणि आर्थिक कामगिरीमुळे अत्यंत नाखूश होते. मार्क डेसडीलर यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, की कंपनीने लागू केलेल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सची मानके त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नव्हत्या. यामध्ये संवादामध्ये मोकळेपणा नसणे, पारदर्शकतेचा अभाव, यामुळे मार्क यांनी आपल्या राजीनामा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 12 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(307)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या