1 May 2025 1:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Tata Group IPO | मोठी संधी चालून येतेय! टाटा ग्रुपचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा

Tata Group IPO

Tata Group IPO | टाटा समूह भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखला जातो. टाटा समूहाच्या कंपनीवर गुंतवणूकदारांचा पूर्ण विश्वास असतो. नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. ( टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनी अंश )

मीडिया रिपोर्टनुसार टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. या कंपनीने Nexon EV आणि Tiago EV मॉडेल्सची निर्मिती केली आहे.

सध्या जगात इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सुरू आहे. अनेक वाहन कंपन्यांनी या क्षेत्रात आधीच एन्ट्री घेतली आहे. टाटा, महिंद्रा, टोयोटा यासारख्या मोठ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनाची विक्री देखील सुरू केली आहे. टाटा मोटर्स ही कंपनी आपल्या टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड या उपकंपनीच्या माध्यमातून ईव्ही व्यवसाय करते.

मीडिया रिपोर्टनुसार टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीचा IPO पुढील 12 ते 18 महिन्यांत लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही कंपनी आपल्या IPO इश्यूद्वारे 1 ते 2 अब्ज डॉलर्स भांडवल उभारण्याचा प्रयत्न करेल. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, टाटा समूह पुढील काही वर्षात ईव्ही क्षेत्रात अतिशय आक्रमकपणे व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखत आहे. या कंपनीचा IPO आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये लॉन्च होऊ शकतो.

टाटा मोटर्स कंपनी या कंपनीच्या IPO च्या माध्यमांतून 1 बिलियन डॉलर्स भांडवल उभारणी करून उत्पादन आणि व्यवसाय विकास यावर अधिक केंद्रित करेल. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीने जानेवारी 2023 मध्ये TPG कडून 1 बिलियन डॉलर्स भांडवल उभारणी केली होती, तेव्हापासून या कंपनीच्या IPO बाबत चर्चा सुरू आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 988.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Group IPO for investment 14 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Group IPO(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या