4 May 2025 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Bank Account Alert | तुम्ही बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये किती पैसे ठेवू शकता? इन्कम टॅक्सचा हा नियम लक्षात ठेवा

Bank Account Alert

Bank Account Alert | बँक खात्यातील पैसे सुरक्षित तर असतातच, शिवाय त्यावर व्याजही मिळते. भारतात गेल्या काही वर्षांत मोठी लोकसंख्या बँकिंग व्यवस्थेशी जोडली गेली आहे. विशेष म्हणजे भारतात बचत खाते उघडण्याची कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच एखादी व्यक्ती कितीही बचत खाती उघडू शकते. अशावेळी एखादी व्यक्ती बचत खात्यात किती पैसे ठेवू शकते हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच बचत खात्यात हवे तेवढे पैसे जमा करू शकता. होय, झिरो बॅलन्स खाते वगळता सर्व बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे.

बचत खात्यात पैसे ठेवण्याची कोणतीही मर्यादा नसली तरी एका आर्थिक वर्षात 10 लाखरुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास बँक त्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (CBDT) देते. हाच नियम रोख ठेवी, म्युच्युअल फंड, रोखे आणि एफडीमधील शेअर्समधील गुंतवणुकीला लागू होतो.

व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स
लाइव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, कर आणि गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन म्हणतात की, एक भारतीय बचत खात्यात कितीही रक्कम ठेवू शकतो. प्राप्तिकर कायदा किंवा बँकिंग नियमांमध्ये बचत खात्यात पैसे जमा करण्यावर कोणतीही मर्यादा नाही. बँकेच्या बचत खात्यावर ठेवलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर बँक खातेधारकाला कर भरावा लागतो.

बँक व्याजावर 10 टक्के टीडीएस कापते. बलवंत जैन यांचे म्हणणे आहे की, व्याजावर कर भरावा लागतो, परंतु, त्यावर कर वजावटही घेता येते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 TTA नुसार सर्व व्यक्तींना 10 हजारांपर्यंत करसवलत मिळू शकते. 10 हजार रुपयांपेक्षा कमी व्याज असेल तर कर भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील खातेदारांना 50 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर भरावा लागत नाही.

प्राप्तिकर विभाग विचारू शकतो पैशांचा स्त्रोत
एखाद्या खातेदाराने एका आर्थिक वर्षात बचत खात्यात 10 लाखरुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर प्राप्तिकर विभाग पैशाचा स्त्रोत विचारू शकतो. या उत्तराने खातेदाराचे समाधान झाले नाही, तर तोही चौकशी करू शकतो. चौकशीत पैशाचा स्त्रोत चुकीचा आढळल्यास जमा रकमेवर प्राप्तिकर विभाग 60 टक्के कर, 25 टक्के अधिभार आणि 4 टक्के सेस लावू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank Account Alert on Saving Account Limit check details 15 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या