6 May 2025 3:33 PM
अँप डाउनलोड

Reliance Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग

Reliance share price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बजेटच्या पार्श्वभूमीवर विक्रीच्या दबावात आले आहेत. सोमवारी हा स्टॉक 3 टक्क्यांच्या घसरणीसह 3019 रुपये किमतीवर आला होता. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या कंपनीची जून तिमाहीची कामगिरी स्टॉक घसरणीचे मुख्य कारण मानले जात आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )

जून तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 5 टक्के घसरण नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने 15138 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. जून तिमाहीत, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे महसूल संकलन वार्षिक आधारावर 12 टक्क्यांच्या वाढीसह 2.36 लाख कोटी रुपयेवर पोहोचले आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.66 टक्के घसरणीसह 2,951 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुवामा :
जून तिमाही निकालानंतर या ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 3786 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

जेफरीज :
जून तिमाही निकालानंतर या ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकची टार्गेट प्राइस 3580 रुपयेवरून कमी करून 3525 केली आहे.

मॅक्वेरी :
जून तिमाही निकालानंतर या ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर न्युट्रल रेटिंग देऊन टार्गेट प्राइस 2750 रुपयेपर्यंत कमी केली आहे.

नोमुरा :
जून तिमाही निकालानंतर या ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकची टार्गेट प्राइस 3450 रुपयेवरून 3600 रुपये केली आहे.

एमके ग्लोबल :
जून तिमाही निकालानंतर या ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर 3350 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE Live 23 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या