4 May 2025 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

RITES Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा?

RITES Share Price

RITES Share Price | राइट्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आज भारतीय शेअर बाजार अक्षरशः क्रॅश झाला होता. हा सर्व जागतिक घडामोडींचा परिमाण आहे. इस्राईल आणि इराण हे दोन्ही शत्रू देश युध्दाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या दोन्ही देशांमधे भीषण युद्ध होण्याची शक्यता आहे. यात अमेरिका आपल्या सर्व लष्करी साधनाचा वापर करून मध्य पूर्व देशांच्या विरोधात इस्रायलला मदत करू शकतो. त्यामुळे संभाव्य जागतिक महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा नकारात्मक परिमाण जगभरातील सर्व शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. ( राइट्स लिमिटेड कंपनी अंश )

आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के घसरणीसह 687.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशा काळात राइट्स लिमिटेड कंपनीने सेबीला एक सकारात्मक बातमी कळवली आहे. नुकताच राइट्स लिमिटेड कंपनीला 25.80 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे.  गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेडने राइट्स लिमिटेड कंपनीला हे नवीन काम दिले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मुल्य 25.80 कोटी रुपये आहे. या कामाची पूर्तता करण्यासाठी राइट्स लिमिटेड कंपनीला 24 वर्षाची मुदत देण्यात आली आहे.

तसेच राइट्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 2.5 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी 8 ऑगस्ट रोजी एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करेल. या कंपनीने गुंतवणुकदारांना शेवटचा लाभांश 9 फेब्रुवारी 2024 रोजी वाटप केला होता. तेव्हा कंपनीने एका शेअरवर 4.75 रुपये लाभांश दिला होता. 2019 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 : 4 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

मागील एका वर्षात राइट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.1 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.5 टक्क्यांनी मजबूत झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 826.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 432.65 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RITES Share Price NSE Live 05 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RITES Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या